• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वझे-केळकर महाविद्यालयात डॉ. लबडेचे मार्गदर्शन

by Ganesh Dhanawade
February 28, 2022
in Guhagar
16 0
0
Vaze-Kelkar College Guidance in Dr. Labade

Vaze-Kelkar College Guidance in Dr. Labade

31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वाचन कट्टा कार्यक्रमात; विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती व पुस्तक समीक्षणा विषयी माहिती

गुहागर, दि. 28 : केळकर शिक्षण संस्थेच्या विनायक गणेश वझे महाविद्यालय (Vaze-Kelkar College) मुलुंड (पूर्व) च्या मराठी विभाग, मराठी भाषा आणि वाङमय मंडळ व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. वाचन कट्टा या कार्यक्रमात खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागरचे (Khare, Dhere, Bhosle College) मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब लबडे यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती व पुस्तक समीक्षण या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना विविध साहित्यप्रकारांविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहित केले. Vaze-Kelkar College Guidance in Dr. Labade

वाचन कट्टा उपक्रमाचे प्रास्ताविक वझे-केळकर महाविद्यालयाचे (Vaze-Kelkar College) मराठी विभाग प्रमुख प्रा.अरविंद जाधव यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात प्रा. अरविंद जाधव यांनी सांगितले की, महाविद्यालयात सुरू असलेला वाचनकट्टा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा आहे. गेली तीन वर्षे अविरतपणे हा उपक्रम सुरू आहे. ग्रंथपाल परितोष पवार यांनी विद्यार्थ्यांनी वाचन करावे. आपल्याला समजलेला आशय वाचन कट्ट्याच्या माध्यमातून व्यक्त करावा. यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी डॉ. बाळासाहेब लबडे यांचा परिचय विशाखा ढोपे हिने केला.  Vaze-Kelkar College Guidance in Dr. Labade

Vaze-Kelkar College

त्यानंतर अग्निपंख-प्रीती गावडे, व्यक्ती आणि वल्ली- तेजस्विनी शिंदे, कॉलनी- रीद्धी मयेकर या वाचक विद्यार्थ्यांनी पुस्तकांविषयी आपला अभिप्राय मांडला. विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन व अभिप्राय कथन याविषयी डॉ. बाळासाहेब लबडे यांनी कौतुक केले. Vaze-Kelkar College Guidance in Dr. Labade

महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.प्रीता निलेश, उपप्राचार्य सीए अनिल नाईक, उपप्राचार्य सीए विद्याधर जोशी, पर्यवेक्षिका प्रा. माधुरी नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. अरविंद जाधव, विषय प्रमुख दत्तात्रय गायकवाड, प्रा.निकिता विचारे, प्रा. संजीव सोनवणे, प्रा. अमोल पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने केले होते.  Vaze-Kelkar College Guidance in Dr. Labade

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी शिंत्रे तर आभार प्रदर्शन कौस्तुभ गोसावी यांनी केले. संपूर्ण महाविद्यालयीन विद्यार्थी-शिक्षक उपस्थित होते. Vaze-Kelkar College Guidance in Dr. Labade

Tags: Bhosle CollegeDhereGuhagarGuhagar NewsKhareLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVaze-Kelkar CollegeVaze-Kelkar College Guidance in Dr. Labadeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.