त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील वरवेली निवोशी रस्त्याची झालेल्या अतिवृष्टीमध्ये दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. वरवेली रांजाणेवाडी ते निवोशी रस्ता हा निवोशी गाव दिशेकडून जवळ जवळ पाचशे मिटर पेक्षा अधिक उखडला असून रस्त्यावर मोठमोठे चर पडल्याने येथील वाहतूक पूर्ण बंद आहे. परिणामी सदर रस्त्यावरून दैनंदिन व्यवहार व कामानिमित्त ये-जा करणार्या ग्रामस्थ जनतेची मोठी अडचण निर्माण झाली आहे. Varveli-Nivoshi road uprooted
सदर रस्ता २००१ मध्ये पूर्ण झालेला असून आजपर्यंत २४ वर्षे झाली. वरवेलीकडून फक्त एक कि.मी.रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे, उर्वरित पुढील रस्ता हा मातीचाच राहिला आहे. सदर रस्त्याची दुतर्फा झाडी साफसफाई व खड्डे बुजवणे हे काम निवोशी मधील नाणेवाडी, कातळवाडी, गणेशवाडीतील ग्रामस्थ दरवर्षी करत आहेत. सदर रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही प्रकारची दुरुस्ती किंवा दुतर्फा झाडी तोडणे होत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत निवोशीतील ग्रामस्थ या रस्त्यासंदर्भात अनेक वेळा लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडे सतत संपर्क साधून देखील या रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष देत नाहीत. गेली दहा वर्ष या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. Varveli-Nivoshi road uprooted

शृंगारतळी तसेच गुहागर येथून येणारे प्रवासी तसेच नागरिक हे वरवेली मार्गे निवोशी येथे येत असतात, परंतु या रस्त्याने वाहतूक सोडा परंतु रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. त्याचप्रमाणे मळण ते निवोशी -पालशेत रस्त्याचीही दुरावस्था झाली आहे. तरी वरवेली-निवोशी उखडलेला रस्त्याच्या कामी त्याचबरोबर मळण ते निवोशी-पालशेत रस्त्याच्या दुरावस्थेबाबत गांभीर्याने दखल घेऊन सदर रस्त्यांची देखभाल दुरुस्तीसह वरवेली-निवोशी रस्त्याची लवकरात लवकर करण्यात यावी, अशी अपेक्षा व मागणी वरवेली व निवोशी गावातून होत आहे. Varveli-Nivoshi road uprooted