गुहागर, ता. 22 : तालुक्यातील वरवेली रांजणेवाडी येथील राजहंस विकास मंडळ व आदर्श महिला मंडळ आयोजित उद्या शनिवार दि.२३ एप्रिल रोजी श्री वरदानीदेवीचा ७ वा वर्धापन दिन सोहळा व श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. Varveli Anniversary Celebration


श्री वरदानीदेवीचा ७ वा वर्धापन दिन सोहळा निमित्त शनिवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. होमहवन व अभिषेक, दुपारी १२ वा. देवीची आरती व ओटी भरणे, दुपारी १ वा. देवीचा भंडारा, दुपारी ३ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सायं. ७ वा. महाप्रसाद, तसेच रात्री ९, वा. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १० वा. राजहंस विकास मंडळ वरवेली रांजाणेवाडी यांचे बहुरंगी नमन आयोजित करणेत आले आहे. Varveli Anniversary Celebration

