• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रम

by Mayuresh Patnakar
August 23, 2022
in Guhagar
16 0
0
Various programs in Velaneshwar college
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअभियानांतर्गत संपन्न

गुहागर, ता. 23 : विद्या प्रसारक मंडळ संचलित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.  हे कार्यक्रम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानाअंतर्गत घेण्यात आले होते.  Various programs in Velaneshwar college

यामध्ये दि. ९ ऑगस्ट रोजी उच्च शिक्षण कोकण विभाग यांच्या निर्देशानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर-वाडदई  येथील कर्मचारी यांना राष्ट्रीय ध्वज वितरित करण्यात आले. दि. १० ऑगस्ट रोजी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता  करण्यात आली. दि. १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. दि. १३ आणि १४ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. दि. १५ ऑगस्ट रोजी वंदे मातरम या गीताचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. कीर्ती आगासे स्पष्ट्र केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. कीर्ती आगासे यांनी ध्वजारोहण सोहळ्यानंतर संपूर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केले. दि.१६ ऑगस्ट रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. दि.१७ ऑगस्ट रोजी निबंध स्पर्धा व स्वराज्य सप्ताह उपक्रमांतर्गत समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. Various programs in Velaneshwar college

Various programs in Velaneshwar college

महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. कीर्ती आगासे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री. अरुण सरगर, सहाय्यक प्राध्यापक श्री. केशव चौगुले, सहाय्यक प्राध्यापक श्री. निखिल पांढरपट्टे, सहाय्यक प्राध्यापक श्री. औदुंबर पाटकर, श्री. संभाजी लोहार, श्री. केतन ओक यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी वरील सर्व उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात मोलाची कामगिरी बजावली. Various programs in Velaneshwar college

Various programs in Velaneshwar college
Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVarious programs in Velaneshwar collegeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.