धार्मिक, सांगितिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन
गुहागर, ता. 20 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवीच्या 15 व्या वर्धापन सोहळ्याला आजपासुन सुरवात होत आहे. दोन वर्ष कोरोना संकटामुळे वर्धापन दिनाचे आयोजन करणे शक्य नव्हते. म्हणूनच यावर्षी नवरात्राप्रमाणे 10 दिवस धार्मिक, सांगितिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन देवस्थानने केले आहे. अशी माहिती श्री दुर्गादेवी देवस्थान फंडचे अध्यक्ष किरण खरे यांनी दिली. Vardhapan Fest of Durgadevi


वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 21 एप्रिल ते 1 मे या कालावधीत दररोज श्रींची महापुजा, सप्तशती पाठवाचन, महानैवेद्य, सायंपूजा, गोंधळ, आरती व मंत्रपुष्प असे कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. Vardhapan Fest of Durgadevi
श्रींच्या महावस्त्रांचा लिलाव
वर्धापन दिन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेला श्रींच्या महावस्त्रांचा लिलाव 23 एप्रिल, 29 एप्रिल, 1 मे व 3 मे या दिवशी दुपारी 3 ते 6 या वेळत होणार आहे. कुलदेवतेचा प्रसाद म्हणून देवीची साडी घेण्यासाठी गुहागर तालुक्याबरोबरच मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून महावस्त्रांच्या लिलावासाठी भक्त येतात. ज्यांना येणे शक्य नसते अशी मंडळी गुहागरमधील ओळखीच्या कुटुंबाना आपल्यासाठी एकतरी देवीची साडी घेवून ठेवा. असा निरोप देतात. त्यामुळे वर्षातून एकदा होणारा हा कार्यक्रम भावपूर्ण असतो. या लिलावातून देवस्थानला मिळणाऱ्या पैशांपेक्षाही मला माझ्या आईची साडी प्रसाद म्हणून मिळाली. या भावनेतून ओसंडणारी तृप्ती इथे पहायला मिळते. Vardhapan Fest of Durgadevi


रात्रीचे विशेष कार्यक्रम
वर्धापन सोहळ्यातील 10 रात्री जगन्मातेच्या प्रागंणात सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम रंगणार आहेत. गुरुवारी 21 जानेवारीला महिला किर्तनकारांची जुगलबंदी पहाण्याची संधी मिळणार आहे. रात्री 9.30 वाजता रत्नागिरी मधील किर्तनकार ह.भ.प. सौ. आदिती वैद्य आणि ह.भ.प. कु. सायली मुळे यांची किर्तने होणार आहेत. Vardhapan Fest of Durgadevi
शुक्रवार, 22 एप्रिलला रात्री 9.30 वा. महिलांसाठी पारंपरिक वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास रु. 2 हजार व द्वितीय क्रमांकास रु. 1 हजार देवून गौरविण्यात येणार आहे. शनिवारी, 23 एप्रिलला दुर्गाश्री संगीत मैफील आणि रविवारी 24 एप्रिलला सांस्कृतिक कार्यक्रम होतील. Vardhapan Fest of Durgadevi


सोमवार 25 एप्रिलला रात्री 9.30 वा. कलारंग नाट्यप्रतिष्ठान वरवडे खंडळा, या मंडळाचे नाट्यकलाकार वाऱ्यावरती वरात हे नाटक सादर करणार आहेत. कै. पु.ल. देशपांडेनी लिखीत सदाबहार विनोदी नाटकाचे दिग्दर्शन नितीन जोशी यांनी केले आहे. याच मंडळाचे कलाकार मंगळवारी रात्री 9.30 वा. विद्याधर गोखले लिखित संगीत जय जय गोरीशंकर या नाट्यकलाकृतीचे सादरीकरण करणार आहेत. Vardhapan Fest of Durgadevi
बुधवारी रात्री 8.00 वा. बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमांतर्गत हुशार होतकरु मुलींना शैक्षणिक मदत आणि मातांचा सन्मान असा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला डॉ. या अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र फडके उपस्थित रहाणार आहेत. Vardhapan Fest of Durgadevi
गुरुवारी 28 एप्रिलला तिरंगी भजन होणार आहे. श्री नतुन गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ, खालचापाट जांगळवाडी, श्री वराती देवी प्रासादिक भजन मंडळ, गुहागर, आणि श्री नुतन ज्ञानेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ किर्तनवाडी गावडे विभाग या मंडळांचे भजन होणार आहे. Vardhapan Fest of Durgadevi
शुक्रवारी 29 एप्रिलला स्तोत्रवर्धिनी हा श्रीमत् जगद्गुरु आद्य शंकराचार्य रचित स्तोत्रगायनाचा कार्यक्रम होणार आहे. सौ. श्रुती आगाशे यांच्या कात्यायनी मंडळातील महिला हा कार्यक्रम सादर करणार आहेत. Vardhapan Fest of Durgadevi
शनिवार 30 एप्रिलला सायं. 4 वा. श्री दुर्गादवी आणि गुहगरचे ग्रामदैवत श्री भैरी व्याघ्रांबरी भेट सोहळा होणार आहे. त्यानंतर श्री दुर्गादेवीची मिरवणुक मंदिरापर्यंत येईल. मंदिरामध्ये सायंकाळी श्रींची पाद्यपुजा, औक्षण होईल. शनिवारी, रात्री ८ वा. कोकण गंधर्व म्हणून ओळखले जाणारे प्रथमेश लघाटे यांचा प्रथम स्वर हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी 1 मे रोजी सकाळी सहस्रचंडी पूर्णाहुती, महाप्रसाद आणि रात्री स्वरांगण हा सांगितिक कार्यक्रम होईल. Vardhapan Fest of Durgadevi