गुहागर, ता. 03 : ग्रुप ग्रामपंचायत आरे वाकी पिंपळवट कार्यक्षेत्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत महसूल गाव पिंपळवट या ठिकाणी वनराई बंधारा बांधण्याचा शुभारंभ पंचायत समिती गुहागरचे माननीय गटविकास अधिकारी श्री शेखर भिलारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. Vanrai dam at Pimpalwat

यावेळी गटविकास अधिकारी श्री भिलारे साहेब यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत ने केलेल्या कामांची पाहणी केली व आवश्यक त्या बाबींविषयी मार्गदर्शन केले. Vanrai dam at Pimpalwat

यावेळी गटविकास अधिकारी, श्री इनामदार, (कृषी विस्तार अधिकारी) श्री के एस कदम, (ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता) श्री साळवी, (जलजीवन मिशन योजनेचे अभियंता) श्री देवकर, श्री माळी, ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री समित घाणेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री विठ्ठल धावडे, दक्षता समिती सदस्य श्री सुरेश सावंत, लुंबिनी नगर वाडी अध्यक्ष श्री कमलाकर पवार, ग्रामपंचायत माजी सरपंच श्रीमती सिद्धी सुर्वे, माजी सरपंच श्री नरेश धावडे, माजी उपसरपंच प्रभाकर धावडे, सर्व ग्रामस्थ, महिला, पुरुष, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, ग्राम पंचायत अधिकारी श्रीम रूपाली मोरे ग्रामपंचायत कर्मचारी वृंद सर्व उपस्थित होते. Vanrai dam at Pimpalwat
