गुहागर, ता. 23 : पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सलग भर दुपारी, रात्री वणवा भडकत आहे. वणवा विजवण्यासाठी गावकरी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पण सारख्या लागणाऱ्या वणव्या मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. काल लागलेल्या वणव्याने खूप मोठा परिसर कवेत घेतल्याने अतोनात नुकसान झाले आहे जे कधीच भरून न निघण्यासारखे आहे. Vanava in Poladpur


पोलादपूर मधील लोहारे चांडवा पार्ले कापडा अशा अनेक गावांमध्ये वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Vanava in Poladpur


डोंगरावर अनेक प्रकारची वनस्पती झाडे नष्ट होत आहेत. प्राणिमात्रांचे जीवनही धोक्यात आलेले दिसून येत आहे. स्थानिक लोकांच्या जागृतीमुळे वणवा विझवण्यात मध्ये काही प्रमाणात यश येत आहे, पण ते फक्त गावाजवळील भागात. परंतु डोंगर माथ्यावर लागलेला वणवा विजवण्यासाठी लागणारी साधने व मनुष्यबळ कमी पडत असल्याने वणवा वाढत चालला आहे. Vanava in Poladpur

