गुहागरचे मुळनिवासी; सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करणारा संशोधक
मयूरेश पाटणकर, गुहागर
गुहागर, ता. 26 : येथील मुळनिवासी, मुंबईत शिक्षण घेवून अमेरिकेत स्थायिक झालेले शास्त्रज्ञ अशोक गाडगीळ यांना नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन या पुरस्काराने राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गौरविले. हा अमेरिकेतील तांत्रिक कामगिरीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. अशोक गाडगीळ हे गुहागरचे मुळनिवासी असून मुंबईत शिक्षण घेऊन अधिक शिक्षणासाठी अमेरिकत गेले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुहागर वरचापाटमधील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. US President Biden presenting White House National Medal to Ashok Gadgil
गुहागर वरचापाट येथील गणपती मंदिराजवळ अशोक गाडगीळ यांचे घर आहे. अशोक गाडगीळ यांचे वडील जगन्नाथ गाडगीळ नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झाले. अशोक गाडगीळ यांचाही जन्म मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मुंबइत झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तेथेच जे लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरीमध्ये ते संशोधक प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले. अशोक गाडगीळ यांनी सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या तंत्रज्ञानाचा शोध लावला. या तंत्रमानाचा उपयोग करुन कमी किंमतीचे पोर्टेबल आणि ऊर्जा-कार्यक्षम वॉटर प्युरिफायर तयार केले. पाण्यातील आर्सेनिक बाजुला काढण्यासाठी ECAR तंत्रज्ञानाचे संशोधन त्यांनी केले. कमी इंधनावर चालणारा कार्यक्षम कुकस्टोव्ह तयार केला. आर्सेनिक उपचार प्रणालीचा शोध लावला. अशोक गाडगीळ यांच्या संशोधनातून निर्माण झालेल्या या उपकरणांचा वापर आज जगात होत आहे. US President Biden presenting White House National Medal to Ashok Gadgil
अशोक गाडगीळ संशोधन आणि विकास या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांना मार्गदर्शन करतात. त्यांनी स्वत: यूसी बर्कले येथे विकास अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम विकसित केले आहेत. आजपर्यंत त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रयोगशाळा संशोधन विभाग, द्विराष्ट्रीय स्वच्छ पाणी-ऊर्जा तंत्रज्ञान संशोधन संस्था आणि जागतिक गरिबीला संबोधित करणाऱ्या विद्यापीठ विकास प्रभाव प्रयोगशाळेचे मध्ये काम केले आहे. US President Biden presenting White House National Medal to Ashok Gadgil
मानवतावादी संशोधक अशी ओळख असलेल्या अशोक गाडगीळ यांच्या कार्याची दखल अमेरिकेने घेतली. राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी 24 ऑक्टोबर 2023 ला नागरी आणि पर्यावरण अभियांत्रिकीचे प्रतिष्ठित प्रोफेसर अशोक गाडगीळ यांना नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन प्रदान केले. हे वृत्त कळताच गुहागर वरचापाटमधील ग्रामस्थांनी अशोक गाडगीळ यांचे अभिनंदन केले. गुहागर मुळनिवासी ग्रामस्थाचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे वरचापाटमध्ये आनंदाचे वातावरण आहे. US President Biden presenting White House National Medal to Ashok Gadgil