आमदार भास्कर जाधवांनी राज्य सरकारला केली विनंती
गुहागर, ता. 25 : आरजीपीपीएल (RGPPL) बंद पडल्यास 4 हजार 630 माणसे रस्त्यावर येतील. तेव्हा राज्य सरकारने तत्काळ या विषयात लक्ष घालावे. असा विषय आमदार भास्कर जाधव यांनी राज्याच्या अधिवेशनात मांडला. संबंधित विभागाने या प्रश्र्नाकडे लक्ष द्यावे. अशी सूचना यावेळी सभापती यांनी केली आहे. Urgent attention should be paid to RGPPL
राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आरजीपीपीएल बंद पडल्यास निर्माण होणाऱ्या बेरोजगारीच्या संकटाबाबत चिंता व्यक्त केली. आमदार जाधव म्हणाले की, गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि विज प्रकल्पाची क्षमता 1900 मेगावॅट निर्मितीची आहे. मात्र गेली 3 वर्ष आरजीपीपीएल (RGPPL)मधुन 500 मेगावॅट वीज निर्मिती सुरु आहे. सध्याचा करार 31 मार्च 2022 ला संपणार आहे. नवा वीज खरेदी करार होण्यासाठी आरजीपीपीएल द्वारा सुरु असलेल्या प्रयत्नांना केंद्र आणि राज्य सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. नव्याने करार न झाल्यास 31 मार्च नंतर कंपनी बंद पडेल. 4 हजार 630 माणसे रस्त्यावर येतील. त्यामुळे या विषयात राज्य सरकारने लक्ष घालावे. याबाबत सभापतींनी राज्य सरकारच्या संबंधित विभागाने या प्रश्र्नाकडे लक्ष द्यावे. अशी सूचना केली आहे. Urgent attention should be paid to RGPPL
गेले दोन महिने आरजीपीपीएलचे (RGPPL) व्यवस्थापनाने राज्य सरकारमधील मंत्री, अधिकारी, केंद्रात असलेले खासदार, दिल्लीतील अधिकारी यांच्या भेटी घेतल्या होत्या. आरजीपीपीएल कंपनीमध्ये आजही राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे शेअर्स आहेत. आता आमदार जाधव यांनी थेट अधिवेशनातच सरकारचे आरजीपीपीएल कडे लक्ष वेधल्याने राज्य सरकार आपल्या मालकीची कंपनी वाचविण्यासाठी कोणती भुमिका घेणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Urgent attention should be paid to RGPPL