• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 November 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात

by Guhagar News
November 4, 2025
in Old News
58 1
0
Unseasonal rains cause damage to agriculture
114
SHARES
327
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निलेश सुर्वे; शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कागदपत्रे जमा करावी

गुहागर, ता. 04 : सध्या गुहागर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात दिवाळीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने कृषी क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यास शासनाकडून सुरुवात झाली आहे. तरी शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे ग्रामपंचायतमध्ये जमा करावीत, असे आवाहन निलेश सुर्वे यांनी केले आहे. Unseasonal rains cause damage to agriculture

गुहागर तालुक्यातील भात शेतीचे प्रचंड नुकसान अवकाळी झालेल्या पावसाने केले आहे. अनेकांच्या शेतातील भात पावसाने पडत्याने भाताच्या लोंब्या चिखल्यात बुडाल्या, पेंढाई फुकट गेला आहे. या अवकाळी पावलाने इतके नुकसान केले की, भविष्यामध्ये गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे. कोकणातील शेतकऱ्याची भातशेती मुळातच कमी असते. यावेळी शेतातून घरात पुरेल इतके तरी पीक घरात येईल का? याबाबतही साशंकता आहे. Unseasonal rains cause damage to agriculture

तरी या नुकसानीची भरपाई करून शेतकऱ्यांचे दुःख थोडे हलके करावे. यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे कृषी विभागातर्फे सुरू आहेत. हे पंचनामे करत असताना आवश्यक असलेला शेतीचा सातबारा, आठ अ चा उतारा, शेतकऱ्याची आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, शेतकऱ्याचा फार्मर आयडी, आणि झालेल्या नुकसानाची फोटो एवढी माहिती ग्रामपंचायत मध्ये दिल्यास ही पंचनाम्याची कार्यवाही गतीने होऊ शकते. त्यामुळे शेतीच्या नुकसानीच्या छायाचित्रांबरोबरच वरील कागदपत्रे शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत जमा करावी. अधिक माहितीसाठी ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. असे आवाहन भाजपचे जिल्हा पदाधिकारी निलेश सुर्वे यांनी केले आहे. Unseasonal rains cause damage to agriculture

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUnseasonal rains cause damage to agricultureटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.