• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर कुणबी नागरी पतसंस्थेची बिनविरोध निवड

by Ganesh Dhanawade
March 31, 2022
in Politics
18 0
0
Unopposed selection of Kunbi Patsanstha
36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चेअरमनपदी रामचंद्र हुमणे तर व्हा. चेअरमनपदी तुकाराम निवाते

संदेश कदम, आबलोली

गुहागर, ता. 31 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकॎरी पतसंस्था लि. आबलोली या पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. रामचंद्र रत्नू हुमणे (गुरुजी), तर व्हा. चेअरमनपदी श्री. तुकाराम बाबाजी निवाते यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सर्व संचालक मंडळही बिनविरोध निवडून आल्याने कुणबी पतसंस्थेच्या गेल्या २१ वर्षाची बिनविरोध निवडणूकीची व “अ” वर्गाची परंपरा कायम राखली आहे. Unopposed selection of Kunbi Patsanstha

गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली, तालुका गुहागर या पतसंस्थेच्या मंजूर प्रचलीत उपविधी मधील तरतूदी नुसार तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चिपळूण यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा मंगळवारी उत्साहात संपन्न झाली. Unopposed selection of Kunbi Patsanstha

यावेळी पतसंस्थेच्या २०२१-२०२२ ते २०२६ -२०२७ या कालावधी करीता नवनिर्वाचित चेअरमन रामचंद्र हुमणे, व्हा. चेअरमन तुकाराम निवाते यांचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. के. एम. देवरुखकर, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामिण शाखा अध्यक्ष व पतसंस्थेचे सल्लागार श्री. कृष्णा वणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. संचालक पदी गुहागर तालुक्यातील आंबेरेखुर्द येथील सर्वसाधारण मधून श्री. पांडूरंग गणपत पाते, पालपेणे तळ्याचीवाडी येथील वैभव सदाशिव आदवडे, गुहागर येथील प्रदिप गोविंद बेंडल, कोळवली येथील अमोल शांताराम वाघे, कोतळूक येथील उदय सखाराम गोरीवले, अनुसूचित जाती /जमाती मधून आबलोली येथील संदेश तुकाराम कदम, सडे जांभारी येथील महिला प्रतिनीधी श्रीम. वनिता पांडूरंग डिंगणकर, आबलोली येथील महिला प्रतिनीधी सौ. श्रावणी अनिकेत पागडे, हेदवी मधील इतर मागासवर्गीय मधून महादेव विश्राम वणे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. Unopposed selection of Kunbi Patsanstha

यावेळी आबलोली पतसंस्थेचे सचिव अनिल घाणेकर, शृंगारतळी शाखेचे लिपीक वैभव बागवे, आबलोली शाखेचे लिपीक संतोष हुमणे, मदतनीस संजय खापले, सुलक्षणा भूवड आदी उपस्थीत होते. Unopposed selection of Kunbi Patsanstha

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUnopposed selection of Kunbi Patsansthaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.