• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत पृथ्वीवरील बदलांचे अनोखे प्रदर्शन

by Guhagar News
March 4, 2022
in Ratnagiri
17 0
0
Unique display of changes on earth at Ratnagiri
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शुल्क म्हणून प्लास्टिकच्या रिकाम्या १० बाटल्या घेणार

गुहागर, दि. 04 :  राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने पुण्यातील असीमित आणि अनुनाद एज्युकेशनल अँड रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन. (Educational and Rural Development Foundation, Pune)  या संस्थांनी ‘पृथ्वीची कहाणी’ माझा ग्रह– माझे घर या विषयावरील हे प्रदर्शन दि. ४ व ५ मार्चला आयोजित केले आहे.  गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या बाबुराव जोशी ग्रंथालयात सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. इयत्ता पाचवीच्या पुढील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी व रत्नागिरीकरांनी आवर्जून प्रदर्शन पाहावे. Unique display of changes on earth at Ratnagiri

या प्रदर्शनात पृथ्वीच्या निर्मितीपासून आत्तापर्यंत झालेल्या बदलांची माहिती आहे. तसेच महाराष्ट्रात आढळणाऱ्या जैवविविधता विभागांची माहिती दिली आहे. या प्रदर्शनासाठी सहआयोजक म्हणून गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (Gogte- Joglekar College), निसर्गयात्री संस्था आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी (Nature Society and Lions Club of Ratnagiri) सहभागी होत आहे. Unique display of changes on earth at Ratnagiri

Unique display of changes on earth at Ratnagiri
Unique display of changes on earth at Ratnagiri

विज्ञान आणि पर्यावरण याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती व्हावी, पृथ्वी आणि तिचे विश्वातील महत्त्व त्यांच्या लक्षात यावे, यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन असीमितचे सारंग ओक, निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई आणि अनुनादच्या पूजा खांडेकर यांनी केले आहे. Unique display of changes on earth at Ratnagiri

प्लास्टिक बद्दल मुलांमध्ये जागृती होण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. मानवनिर्मित कचऱ्याचा निसर्ग आणि जैवविविधतेवर होणारा परिणाम विद्यार्थी व नागरिकांना कळावा.  व त्यांच्याकडून त्याची काही प्रमाणात भरपाई व्हावी, या हेतूने उपक्रमासाठी अनोखे असे प्रवेश शुल्क ठेवलेले आहे.  ते म्हणजे १० रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या. प्रत्येक विद्यार्थ्याने पाण्याच्या १ लीटरच्या १० रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या आणायच्या आहेत. Unique display of changes on earth at Ratnagiri

अधिक माहितीसाठी – सुहास ठाकूरदेसाई – ९८२२२९०८५९, व सुधीर रिसबूड ९४२२३७२०२० यांच्याशी संपर्क साधावा.

Tags: Gogte- Joglekar CollegeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNature Society and Lions Club of RatnagiriNews in GuhagarUnique display of changes on earth at Ratnagiriटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.