• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेतमधील बालकाचा दुर्दैवी मृत्यू

by Ganesh Dhanawade
June 18, 2022
in Guhagar
29 0
0
पालशेतमधील बालकाचा दुर्दैवी मृत्यू
56
SHARES
161
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

खेळताना साडीच्या झोपाळ्याचा लागला फास

गुहागर, ता. 18 : साडीच्या झोपाळ्यात खेळताना फास लागून एका 15 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू (unfortunate death) झाला आहे. ही घटना पालशेत बाजारपेठ सावरकर पेठ येथे शुक्रवारी (ता. 17) रात्री घडली. निहाल सुभाष जाक्कर असे या मुलाचे नांव आहे. तो इयत्ता 8 वी मध्ये शिकत आहे.

या घटनेची माहिती जितेंद्र दत्ताराम वायंगणकर (वय 36) रा. पालशेत यांनी गुरुवारी (ता. 18) गुहागर पोलीस ठाण्यात दिली. त्या माहिती नुसार. जितेंद्र वायंगणकर हे पालशेत बाजारपेठेतील सावरकर पेठेत राहतात. त्यांच्या घरी त्यांची पत्नी अपेक्षा,  मुलगी श्रेया,  त्यांचा आतेभाऊ सुभाष जाक्कर, त्यांची पत्नी शकुंतला जाक्कर, त्यांची मुले सृष्टी, निहाल व स्वराज अशी दोन कुटुंब एकत्र रहातात.  महिनाभरापूर्वी मुलांना खेळण्याकरता घराच्या माळ्यावर जितेंद्र वायंगणकर यांनी नायलॉनच्या साडीचा झोपाळा बांधला होता. या झोपाळ्यावर स्वराज, श्रेया, आणि निहाल हे दररोज खेळायचे. (unfortunate death)

Unfortunate Death

जितेंद्र वायंगणकर यांचे साखरीआगर, ता. गुहागर येथे बेकरीचे दुकान आहे. गुरुवारी ( ता. 17) जितेंद्र वायंगणकर रात्री नऊ वाजता बेकरीतील काम आटपून घरी आले. त्याचवेळी त्यांचा मित्र नंदकुमार धोपावकर याचा त्यांना फोन आला.  त्यांच्याशी फोनवर बोलत जितेंद्र वायंगणकर घराच्या माळ्यावर गेले. तिथे त्यांच्या आतेभावाचा मुलगा निहाल नायलॉन साडीच्या झोपाळ्यात गुरफटलेला त्यांना दिसला. निहालच्या मानेला साडीचे वेटोळे होते. तर निहालचे पाय जमिनीपासून वर लोंबकळत होते.  तातडीने त्यांनी सुभाषला बोलावले. दोघांनी नायलॉन साडीच्या झोपाळ्यात अडकलेल्या निहालला सोडवायला सुरुवात केली. निहालला माळ्यावरून खाली आणून पालशेतमधील डॉक्टर ढेरे यांच्या खासगी दवाखान्यात घेऊन गेले.  मात्र डॉक्टरांनी तपासून निहालला पुढे घेऊन जाण्यास सांगितले. जितेंद्र आणि सुभाष, निहालला घेऊन शृंगारतळी येथील डॉक्टर राजेंद्र पवार यांच्या दवाखान्यात गेले. त्यावेळी डॉक्टर पवार यांनी निहालचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. unfortunate death

गुरुवारी, ता. 17 रात्री 8 ते 9 च्या दरम्यान निहाल एकटाच माळ्यावर खेळायला गेला होता. याच दरम्यान साडीच्या झोपाळ्यात मान अडकून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री निहालचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे नेण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया आटोपल्यानंतर शोकाकूल वातावरणात पालशेतमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  चिमकुल्या निहालचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पालशेतमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास गुहागरचे प्रभारी पोलिस निरीक्षक बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarunfortunate deathटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.