वेळंब नालेवाडीतील घटना, दोनजण गंभीर, चिपळूणात उपचार सुरु
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील वेळंब नालेवाडी येथे सोमवारी (ता. 14) सायंकाळी 5.30 वा. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत जयराम बाबाजी नर्बेकर (वय 52) यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर चिपळूण येथे उपचार सुरु आहेत. हा अपघात सोमवारी (ता. 14) सायंकाळी 5.30 वा झाला.Two-wheeler accident,1 dies 2 injured

जयराम नर्बेकर (वय 52) हे जानवळे ओझरवाडी, ता. गुहागर येथे रहातात. सामाजिक कार्यकर्ते असलेले जयराम विवाह उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते त्यांच्या बहीणीला भेटण्यासाठी वेळंब नालेवाडी येथे गजानन नांदलस्कर यांच्या घरी दुचाकीवरुन (MH 08 AB 1279) आले होते. बहिणीला भेटून ते बाहेर पडले. गजानन नांदलस्कर यांच्या घरातून दुचाकीवरुन बाहेर पडून शृंगारतळीच्या दिशेने जाण्यास निघाले. इतक्यात आबलोलीकडून शृंगारतळीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने (स्पोर्ट बाईक क्र. MH 08 AS 8241) जयराम नर्बेकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोन्ही दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर आदळले. जयराम नर्बेकर यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. तर स्पोर्टस् बाईकवरील बासीत दाऊद चिपळूणकर आणि साईक हानिफ तवसाळकर (दोघेही रहाणारे पडवे) हे देखील गंभीर जखमी झाले. Two-wheeler accident,1 dies 2 injured. हा अपघात सोमवारी (ता. 14) सायंकाळी 5.30 वा झाला. गंभीर जखमी असलेल्या बासीत चिपळूणकर आणि साईक तवसाळकर यांच्यावर चिपळूण येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताची घटना समजताच गुहागरचे प्रभारी पोलीस निरीक्षक बी. के. जाधव त्यांच्या सहकाऱ्यांसह वेळंब नालेवाडीत पोचले. जयराम नर्बेकर यांचा मृतदेह चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. Two-wheeler accident,1 dies 2 injured
सदर अपघाताबाबत अजय नामदेव नर्बेकर, (वय 33, रा. सतीचा माळ, वेळंब रस्ता, ता. गुहागर) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बासीत आणि साईक यांच्या विरोधात बेदरकारपणे वाहन चालवून दुसऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत होणे यासाठी असलेल्या (भारतीय दंडसंहिता कलम Indian Penal 304 अ, 289, 337 व 338 या कलमांखाली) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Two-wheeler accident,1 dies 2 injured
