गुहागर, ता. 10 : चिपळुण मधील सती येथील कार व्यावसायिक सुनील दादा हसे (54, मूळ रा. अंबड-अकोले, अहिल्यानगर) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी मोहन पांडुरंग सोनार (54)अक्षय सचिन जाधव (22, दोघेही रा. बोरसूत-संगमेश्वर) व वंदना दादासाहेब पुणेकर (36, रा. लेन-जयसिंगपूर, कोल्हापूर) या तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे. पैशाच्या हव्यासापोटी हा खून केल्याची कबुली या तिघांनी दिली. Two arrested in Chiplun murder case


दि. 27 एप्रिल रोजी पहाटे सुनील हसे यांना गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर कारमध्येच ओढणीने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. खूनानंतर मृतदेह मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील कशेडी घाट रस्त्यालगत फेकून देत ते पसार झाले होते. खुनानंतर 30 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मृतदेह घाटात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. भोगाव-पोलादपूरच्या पोलीस पाटील शुभांगी उतेकर यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. Two arrested in Chiplun murder case
याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 4 दिवसातच अक्षय जाधव याच्या मुसक्या आवळल्यानंतर खून प्रकरणाचा छडा लागला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलादपूर पोलिसांसमोर असतानाच तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अखेर ओळख पटवत पोलिसांनी तपासाला गती दिली गेली. Two arrested in Chiplun murder case


अक्षय जाधव याच्याकडून पोलिसांच्या हाती धागेदेरे लागल्यानंतर मृतदेह फेकून पसार झालेल्या अन्य दोन संशयितांच्या मागावर पोलादपूर पोलीस होते. दोन्ही संशयित आपली ओळख लपवत कर्नाटक- सीमावर्ती भागात लपून सलग दोन महिने पोलादपूर पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर दोघांनाही पकडत पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा केला. Two arrested in Chiplun murder case