नगरपंचायतीत निर्णय, ब्ल्यु फ्लॅग मानांकनाला मिळणार बळ
गुहागर, ता. 26 : एप्रिल महिन्यात गुहागर मध्ये कासव महोत्सव घेण्याचा निर्णय काल नगरपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला. कासव महोत्सवापूर्वी शहरातील पर्यटन व्यावसायिक, पर्यटन प्रेमी आणि सर्व नागरिकांना हा महोत्सव कसा असेल याचे प्रात्यक्षिक कांदळवन प्रतिष्ठानतर्फे दाखविण्यात येणार आहे. Turtle Festival in Guhagar
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यांवर 6 कासव संवर्धन केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रांमधुन जवळपास रोज कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. निसर्गाचा हा आविष्कार पर्यटकांना प्रत्यक्ष पहाता यावा. वन विभागाच्या शेड्युल्य अ श्रेणीतील ऑलिव्ह रिडले कासवांच्या जीवनचक्राची माहिती मिळावी. आणि गुहागरातील समुद्र पर्यटनाला बळ मिळावे. या हेतूने कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या संदर्भात काल गुहागर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष सौ. निता मालप, उपनगराध्यक्ष प्रदिप बेंडल, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी, पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी कांदळवन प्रतिष्ठाने विभागिय वनाधिकारी किरण ठाकूर, वेळासमधील कासव महोत्सवाचे प्रणेते भाऊ काटदरे आणि कांदळवन प्रतिष्ठानचे मोहन उपाध्ये उपस्थित होते. Turtle Festival in Guhagar

भाऊ काटदरे यांनी सर्वांचे सहकार्य असेल तर कासव महोत्सव यशस्वी होईल असे सांगतात कासवाशी संबधित सर्व कामे केवळ वन विभाग व कांदळवन प्रतिष्ठानेच अधिकारी, कर्मचारी करतील. त्यात आपण कोणतीही ढवळाढवळ करु नये. आपण फक्त कासवाची पिल्ले सोडण्याचे वेळी पर्यटक तेथे कसे पोचतील आणि तेथील आचारसंहिता कशी पाळतील याकडे लक्ष देऊया. त्याचबरोबर गुहागरचा इतिहास, येथील निसर्ग सौंदर्य, पक्षी निरीक्षण, धार्मिक पर्यटन असे मुद्दे जोडून कासवांची पिल्ले पहायला येणारा पर्यटक गुहागरात अधिक काळ कसा थांबेल यासाठी प्रयत्न करु या. असे आवाहन केले. Turtle Festival in Guhagar
कांदळवन प्रतिष्ठानचे मोहन उपाध्ये म्हणाले की, आपल्याकडे जे वैशिष्ट्यपूर्ण आहे ते जपणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. कासवांच्या पिल्लांना हाताळणे, कासवांच्या पिल्लांच्या फोटोंचा वापर करुन चुकीच्या पध्दतीने त्यांची जाहीरात करणे, शहरातील मोठ्या पर्यटन संस्था पैशांचे आमिष दाखवून काही वेळा असे इव्हेंट हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात. अशा पर्यटनामधुन येणाऱ्या चुकीच्या गोष्टी सुरूवातीपासूनच कटाक्षाने टाळाव्यात. कासव संवर्धनासंदर्भातील नियम, आचार संहिता यांचे कडक आचरण सुरवातीपासून ठेवले तर हा वन महोत्सव चांगल्या प्रकारे प्रस्थापित होईल. यावेळी त्यांनी कोकण किनारपट्टीवरील अपयशी ठरलेले कासव महोत्सव, कासव महोत्सवाची बेकायदेशरी गोष्टी उदाहरणे देवून सांगितली. Turtle Festival in Guhagar
