• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 April 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये कासव महोत्सवाला सुरुवात

by Guhagar News
April 1, 2026
in Guhagar
84 0
0
Turtle Festival Begins in Guhagar
164
SHARES
469
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महोत्सवातून उलगडणार कासवाचा जीवन क्रम

गुहागर, ता. 01 : गुहागर येथे ऑलिव्ह रिडले कासव महोत्सवाला पिंपळादेवी बीच गुहागर (वरचापाट) येथे आज 1 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली आहे. कासव महोत्सवाच्या पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला यापुढे संपूर्ण एप्रिल महिन्यात गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरती कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी निसर्गप्रेमींनी आणि पर्यटकांनी कासवाचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी गुहागरच्या कासव महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन कांदळवन कक्ष आणि गुहागर नगरपंचायतीने केले आहे. Turtle Festival Begins in Guhagar

Turtle Festival Begins in Guhagar

गुहागर च्या समुद्र किनारी साधारणपणे रामेश्वर स्मशान भूमी ते बाग या किनारपट्टी वरती ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचं संवर्धन केले जाते. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यांवर 6 कासव संवर्धन केंद्र उभारण्यात आली असून यावर्षी सुद्धा साधारणपणे 186 घरटी गुहागर मध्ये आहेत. या केंद्रांमधुन जवळपास रोज कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. मागील 2 वर्ष मध्ये महाराष्ट्र मधील सर्वात जास्त कासवांची घरटी आणि अंडी गुहागर मध्ये सापडत आहेत. Turtle Festival Begins in Guhagar

Turtle Festival Begins in Guhagar

महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि  सुंदर समुद्र किनारा आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कासवांच संवर्धन गुहागर मध्ये होत आहे.  निसर्गाचा हा आविष्कार पर्यटकांना प्रत्यक्ष पहाता यावा. वन विभागाच्या शेड्युल्य अ श्रेणीतील ऑलिव्ह रिडले कासवांच्या जीवनचक्राची माहिती मिळावी. आणि गुहागरातील समुद्र पर्यटनाला बळ मिळावे. या हेतूने कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी सकाळी 6.30 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन नगरपंचायत मार्फत करण्यात आले आहे. Turtle Festival Begins in Guhagar

Turtle Festival Begins in Guhagar

Tags: GuhagarGuhagar BeachGuhagar Nagar Panchayat Turtle Festival Begins in GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMangrove CellMarathi NewsNature EnthusiastsNews in GuhagarOlive Ridley turtleTouristsTurtleTurtle Conservation CenterTurtle FestivalTurtle Festival Begins in Guhagarऑलिव्ह रिडले कासवकांदळवन कक्षकासवकासव महोत्सवकासव संवर्धन केंद्रगुहागर नगरपंचायतगुहागर बीचटॉप न्युजताज्या बातम्यानिसर्गप्रेमीपर्यटकमराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.