गुहागर, ता. 13 : गोविंदराव निकम कृषी महाविद्यालय, पालवण या कृषी संवाद गटाने निगुंडळ येथील मुकनाक रोपवाटीका व हळद लागवडीच्या प्रात्यक्षिक प्लाॅटला भेट देवून स्पेशल कोकण -4 या हळदीच्या वाणाबाबत माहिती घेतली. SK-4 हे हळदीचे वाण सचिन कारेकर यांनी प्रयोग करून विकसित केलेली अतिशय उत्कृष्ट असे वाण आहे. या १ रोपामागे किमान ६०० ग्राम उत्पन्न देऊ शकते, असा प्राथमिक अंदाज आहे. Turmeric cultivation information


डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी पालवण येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२२ साठी चिपळूण व गुहागर तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध गटांत कार्यरत आहेत. ग्रामीण स्तरावर शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन कृषी प्रात्यक्षिके दाखवत आहेत. यातील ‘कृषिसंवाद ‘ या मार्गताम्हाणे येथील गटाने निगुंडळ येथील मुकनाक रोपवाटीका व वसंत मुकनाक यांच्या हळद लागवडीला भेट दिली. पंचायत समिती गुहागर च्या हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पातून ही हळद रोपांपासून ही लागवड करण्यात आलेली आहे. हा प्लाॅट हळद बियाणे निर्मितीसाठीचा प्लाॅट असल्याची व प्रायोगिक स्तरावर असलेल्या SK- 4 या सचिन कारेकर यांनी विकसीत केलेल्या नवीन हळदीच्या जातीची माहिती यावेळी उपस्थित कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी दिली. Turmeric cultivation information


या कृषी संवाद गटात मनीष बाविस्कर, सुरज बाईत, विपुल भोगाडे, राज उपाध्याय, जिग्नेश कोकरे, तेजस सकपाळ, प्रथमेश भोईर, गणेश ठोंबरे, प्रथमेश चव्हाण आणि अभिषेक म्हात्रे असे विद्यार्थी आहेत. Turmeric cultivation information

