पं.स.गुहागरचा उपक्रम; 50 हजार हळदीचे रोपे तयार
गुहागर, ता. 01: जिल्हा परिषद रत्नागिरी कृषी विभागाच्या सहकार्याने पंचायत समिती गुहागरमार्फत यावर्षीच्या खरीप हंगामात ‘हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम ‘ राबविण्यात येणार असून सुमारे 5 एकर क्षेत्रासाठी 50,000 रोपांची रोपवाटीका पं.स.कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. Turmeric cultivation in 5 acres

गुहागर तालुक्यात सुमारे 5 एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्वावर करण्याचे लक्ष्य पंचायत समिती कृषी विभागाने निश्चित केले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी हळदीच्या रोपांवर शेतकर्यांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच लागवडीमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना हळद लागवड ते हळद काढणीपर्यंत संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन पं.स.च्या कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. Turmeric cultivation in 5 acres

हळदीची रोपे शेतकऱ्यांना गुहागर तालुक्यातच उपलब्ध व्हावीत म्हणून कृषी विभागाने निगुंडळ येथील शेतकरी वसंत मुकनाक यांच्या जागेत हळद रोपवाटिका तयार केली. येथे लागवडीसाठी योग्य अशी )50 हजार रोपे तयार आहेत. या प्रकल्पात SK-4 ( स्पेशल कोकण -4) या हळदीच्या वाणाच्या बियाण्याचा वापर करण्यात येणार आहे. डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली कडून विकसीत केलेल्या हळकुंडापासून रोपे तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग या प्रकल्पात करण्यात आला आहे. Turmeric cultivation in 5 acres
या हळद रोपवाटीकेला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डाॅ.अमोल भोसले व सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी भेट देवून हळद रोपांची पाहणी केली. यावेळी त्यांचे सोबत कृषी अधिकारी आर.के.धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर हे उपस्थित होते. Turmeric cultivation in 5 acres