ग्रामपंचायतीने राबविलेला उत्तम उपक्रम ; गट विकास अधिकारी प्रशांत राऊत
गुहागर, ता. 24 : पालपेणे येथे हळद लागवडीचे डेमो प्लाँटच्या “प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण ” या उपक्रमाच्या निमित्ताने व कृषी संजीवनी सप्ताहाच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने आयोजित केले होते. या कार्यक्रमाला नुकतेच रूजू झालेले गटविकास अधिकारी श्री. राऊत यांनी भेट दिली. पं.स.गुहागरच्या कृषी विभागामार्फत हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम 2022 अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. Turmeric cultivation at Palpene

हळद लागवडीचा उपक्रम हा पालपेणे ग्रामपंचायतीने राबविलेला उत्तम उपक्रम आहे. असे उपक्रम राबवून शेतक-यांनी आपला आर्थिक विकास करावा, असे आवाहन पं. स. गुहागरचे गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी केले. गावाच्या विकासासाठी पंचायत समितीचे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. Turmeric cultivation at Palpene

सदरचे प्रात्यक्षिक डेमो प्लाॅट रघुनाथ घाणेकर यांच्या शेतावर घेण्यात आले. यावेळी SK-4 या वाणाच्या हळद रोपांची लागवड करण्यात आली. शेणखत गांडूळखत (vermicompost), बायोपाॅवर (biopower), सुफला (sufla), क्लोरोपारीफाॅस पावडर (chloropariphos powder), संवर्धन या खताचा वापर यावेळी करण्यात आला. हळद लागवडीबाबत सविस्तर तांत्रिक बाबी सर्व उपस्थितांना कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी समजावून सांगितले व शंकांचे समाधान केले. Turmeric cultivation at Palpene

या कार्यक्रमाला पंचायत समिती गुहागर चे गट विकास अधिकारी राऊत यांचेसोबत, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळसकर, पालपेणेचे सरपंच योगिता पालकर, उपसरपंच रघुनाथ घाणेकर, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, पालपेणे सोसायटीचे सचिव विनायक घाणेकर, मंडळ कृषी अधिकारी श्री. कोळी, कृषी सहाय्यक प्रतिक बांगर, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामविकास अधिकारी सौ. प्रियंका जाधव, TWJ फाऊंडेशन-द सोशल रिफाॅर्मचे प्रथमेश पोमेंडकर, कृषी समन्वयक शैलेंद चौगुले, उज्ज्वला महाडीक व शेतकरी उपस्थित होते. Turmeric cultivation at Palpene
