दुचाकीस्वार गंभीर जखमी, तिन्ही वाहनांचे नुकसान
गुहागर, ता. 03 : गुहागर चिपळूण महामार्गावरील मोडकाआगर धरण रस्त्यावर शुक्रवार (ता. 2) सायंकाळी 6.15 च्या सुमारास तिहेरी अपघात घडला. गुहागरकडे येणारा तरुण एका चारचाकीला ओव्हरटेक करताना समोरुन येणाऱ्या चारचाकीवर आपटला. ही धडक इतकी जोरदार होती की चारचाकी वाहनावर आपटून दुचाकी ओव्हरटेक करत असलेल्या वाहनावर जावून आदळली. या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकी आणि चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. Triple accident on Guhagar Chiplun highway
याबाबत अपघात स्थळावरुन मिळालेल्या माहितीप्रमाणे गुहागर शहरातील कीर्तनवाडी येथे रहाणारा सुमीत जोशी (वय 30) हा तरुण आपली दुचाकीवरुन शृंगारतळीकडून गुहागरकडे भरधाव वेगाने चालला होता. मोडकाआगर येथील खातू मसाले उद्योग बसथांबा ओलांडल्यानंतर दुचाकीस्वार त्यांच्या समोर असलेल्या चारचाकी वाहनाला (महेंद्रा सुप्रिमो एम एच 08 बी यू 1383) ओव्हरटेक करत होता. इतक्यात गुहागरकडून शृंगारतळीकडे जाणारी चारचाकी (महेंद्रा बोलेरो एमएच 02 ईसी 0828) समोर आली. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराला वेग नियंत्रित करता आला नाही. समोरुन येणारा दुचाकीस्वार आपल्या वाहनावर आदळणार हे लक्षात येताच बोलेरोच्या चालकाने आपली गाडी डाव्या बाजुला घेतली. तरीही दुचाकीस्वार बोलेरोवर जावून आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की बोलेरोचे स्टेअरींग जागीच लॉक झाले. धडक दिल्यानंतर दुचाकी तेथून उडाली आणि ओव्हरटेक करत असलेल्या सुप्रिमो वाहनावर जावून आदळली. Triple accident on Guhagar Chiplun highway
या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार सुमीत जोशी यांच्या दोन्ही हातपायांना जबर दुखापत झाली आहे. वेगाने दोन वाहनांवर आपटल्याने दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. बोलेरो पिकअप या वाहनाच्या चालकाच्या बाजुच्या टायरवर दुचाकी आपटल्याने स्टेअरिंग लॉक झाले. चालकाच्या बाजुला हेडलाईट, बंपर व दरवाजा यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शृंगारतळीकडून गुहागरकडे जाणाऱ्या सुप्रिमो वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. Triple accident on Guhagar Chiplun highway
जखमी सुमीत जोशी या दुचाकीस्वाराला तातडीने शृंगारतळी येथील डॉ. सचिन ओक यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायाची दोन बोटे तुटली होती. त्यावर कमी कालावधीत उपचार व्हावेत यासाठी शृंगारतळीत प्राथमिक उपचार करुन सुमीत जोशी याला मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थीर आहे. दरम्यान सदर अपघाताची खबर अपघातग्रस्त बोलेरो पिकअपचे चालक सचिन खरे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास दिली आहे. या घटनेचा पंचनामा शनिवारी (ता. 03 जून) होणार आहे. Triple accident on Guhagar Chiplun highway