गुहागर, ता. 30 : बारामती येथे विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना गुहागर तालुक्यातील सर्वपक्षीय जनतेने श्रद्धांजली अर्पण केली. या पार्श्वभूमीवर गुहागर शहरातील भंडारी भवन येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी नगराध्यक्ष, नगरसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. Tribute to Deputy Chief Minister Ajitdada Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांनी या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. कोणालाही वैयक्तिक निरोप न पाठवता सभेच्या आयोजनाबाबत समजल्यावर सर्वांनी उपस्थिती दर्शवली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्प अर्पण केले. त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादा बद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यांचं स्पष्ट बोलणं निर्णय क्षमता आणि कर्तृत्व यावर सर्वांनी प्रकाश टाकला. वैयक्तिक झालेल्या भेटी आणि त्यावेळेस त्यांचं बोलणं याचे अनेक किस्से यावेळी सर्वांनी सांगितले. महाराष्ट्रातल असं हे मोठ नेतृत्व एका अपघातामध्ये काळाच्या पडद्याआड गेले. याचं सर्वांनी दुःख व्यक्त केलं. Tribute to Deputy Chief Minister Ajitdada Pawar

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक कनगुटकर, राष्ट्रवादीचे सचिव संतोष जोशी, नगराध्यक्ष नीता मालप, अमरदीप परचुरे, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, पराग कांबळे, निलेश मोरे, भाजपाचे जिल्हा सचिव निलेश सुर्वे, माझी नगराध्यक्ष सौ स्नेहा वरंडे आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Tribute to Deputy Chief Minister Ajitdada Pawar
