• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडदे शाळेत बाबा महाराज यांना श्रद्धांजली

by Guhagar News
October 27, 2023
in Guhagar
70 1
0
Tribute to Baba Maharaj in Khodde School
138
SHARES
394
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं.१ या शाळेत  महावैष्णव वारकरी संप्रदायाचे परमपूज्य गुरुवर्य बाबा महाराज सातारकर माऊली यांच्या दु:खद निधनामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपसरपंच कु.पूजा गुरव, मुख्याध्यापक श्री.लोणारे, शिक्षक तज्ञ श्री.विलास गुरव, सौ.वैदही चव्हाण तसेच विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते. Tribute to Baba Maharaj in Khodde School

Tribute to Baba Maharaj in Khodde School

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ. प. बाबा महाराज सातारकर यांनी नवी मुंबईतील नेरूळ येथे अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. त्यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं.  Tribute to Baba Maharaj in Khodde School

Tribute to Baba Maharaj in Khodde School

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं. त्यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी आयुष्य घालवलं. कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त जमत होते. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. तिथूनच त्यांवर कीर्तनाचे संस्कार रुजत गेले. वयाच्या अकराव्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले होते. Tribute to Baba Maharaj in Khodde School

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTribute to Baba Maharaj in Khodde Schoolटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet35
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.