वारकरी भजनासहीत वृक्षदिंडी ; ३००० वृक्ष लागवडीचा संकल्प
गुहागर, ता. 30 : महसुल विभागाच्यावतीने गुहागरमध्ये वारकरी सांप्रदायाच्या भजनासहीत पालखीमध्ये वृक्षाची वृक्षदिंडी काढण्यात आली. एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, शहरातील प्रत्येक विभागातील अधिकारी, वृक्षप्रेमी यांच्या समवेत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शहरातील पोलिस परेड मैदानावर पार पडला. Tree planting


गुहागरच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाचा उपक्रम राबविला होता. यामाध्यमातून तालुक्यात ३००० वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. गुहागर पोलिस परेड मैदानावर प्रथम पालखीमध्ये कल्पकवृक्ष नारळाचे पुजन करण्यात आले. त्यानंतर बालभारती पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी वृक्षतोड थांबवावी, यावर पथनाटय सादर केले. उपस्थित मान्यवरांना वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.


त्यानंतर मळण पाखरवाडी येथील हनुमान विकास मंडळ वारकरी सांप्रदायांचे वारकरी भजनासहीत वृक्षदिंडीत सामील झाले. तहसिलदार सौ. वराळे यांनी वृक्षदिंडीला खांदा देत ही वृक्ष दिंडी काढण्यात आली. पोलिस परेड मैदान ते गुहागर एस. टी. स्टँड व पुन्हा पोलिस परेड मैदान अशी सवाद्य वृक्षदिंडी काढण्यात आली. यानंतर पोलिस परेड मैदानावर उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. Tree planting


यावेळी तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, पोलिस निरिक्षक बी. के. जाधव, गोल्डसन सॅम्युअल, जीवनश्री प्रतिष्ठानचे संतोष वरंडे, अरूण परचुरे, सौ. स्नेहा वरंडे, प्रभुनाथ देवळेकर, सुधाकर कांबळे, सर्कल अधिकारी सचिन गवळी, तलाठी करंबळे, अस्मिता चव्हाण, सार्कजनिक बांधकाम शाखा अभियंता महेश नित्सुरे, तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जांगीड, डा. अमोल गोरे, मंदार छत्रे, वनपाल संतोष परशेटये, गुहागर हायस्कुल एनसीसी, खरे-ढेरे-भोसले कालेज एनएसएस विभागातील विद्यार्थी, शिक्षक, बालभारती पब्लिक स्कुलचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. Tree planting

