• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जानवळे येथे आज वृक्षारोपण

by Ganesh Dhanawade
June 20, 2025
in Guhagar
194 2
0
Tree plantation today at Janvale
381
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अभिनेते ओंकार भोजने यांची उपस्थिती आकर्षण ठरणार

गुहागर, ता. 20  : पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने गुहागर तालुक्यातील जानवळे येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास सिनेअभिनेते ओंकार भोजने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आज शुक्रवारी दुपारी ३ वाजता मराठी शाळा जानवळे नं. १ परिसरात हा कार्यक्रम पार पडणार आहे. Tree plantation today at Janvale

Minor girl kidnapped from Ratnagiri

या उपक्रमाचे आयोजन शिवतेज फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी नाटक कंपनी चिपळूणचे सहकार्य लाभणार आहेत. यावेळी गटविकास अधिकारी शेखर भिलारे, शिवतेज फौंडेशनचे अध्यक्ष ऍड. संकेत साळवी, जानवळे सरपंच जान्हवी विखारे, उपसरपंच वैभवी जानवळकर, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी श्री. धायगुडे, ग्रामसेवक जी. बी. सोनावणे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. Tree plantation today at Janvale

कार्यक्रमादरम्यान अभिनेते ओंकार भोजने विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देणार असून, शाळेच्या परिसरात विविध प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे परिसराच्या हरित समतोलात भर पडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणपूरक संदेश देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. Tree plantation today at Janvale

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTree plantation today at Janvaleटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share152SendTweet95
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.