आनंदवन बुद्ध विहार येथे उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न
गुहागर, ता.18 : वाढत्या महागाईला सामोरे जायचे असेल तर आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. तरुण – तरुणींनी शासन दरबारी नोक-या मिळवण्याच्या मृगजळाच्या मागे न जाता. स्वत: उद्योग, धंदे उभारुन कुटुंबाचे आणि समाजाचे आर्थिक सक्षमीकरण मजबूत करा, असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे यांनी केले. ते आबलोली येथील प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. Training camp

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पूणे, पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने बार्टीव्दारे स्थापित अनुसूचित जातीतील स्वयंसहायता युवा गटाकरीता उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रम शिबीराचे उदघाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. हे प्रशिक्षण शिबीर १५ जून २०२२ ते १५ जुलै २०२२ या कालावधीत आनंदवन बुद्ध विहार आबलोली सभागृह येथे चालणार आहे. Training camp

या प्रशिक्षण शिबीराच्या प्रारंभी मान्यवरांचे हस्ते तथागत भगवान गौतम बुध्द , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री. गावडे यांनी जगाच्या पाठीवर कुठलाही उद्योग आजारी पडत नाही. मात्र, त्या कंपनीचे, त्या उद्योगाचे व्यवस्थापन आजारी असते. परंतू आपला उद्योग आजारी पडणार नाही, त्याचे व्यवस्थापन कसे करावे, हे या प्रशिक्षणात शिकवीले जाणार आहे. आपला जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. पर्यटक व कृषी उद्योगधंदे कसे करावे, मुख्यमंत्री विकास योजना, समाज कल्याण खाते, खादीग्राम उद्योग आदी योजनांची महत्वपूर्ण माहीती तसेच प्रकल्प अहवाल , प्रोजेक्ट कसा तयार करायचा याची सर्व माहिती या प्रशिक्षणातून देत सक्षम उद्योजक तयार केले जातील असे गावडे म्हणाले. Training camp

यावेळी ग्रामसेवक बी.बी. सुर्यवंशी, माजी सैनिक व बौध्दजन सहकारी संघ तालुका गुहागर धम्म संघटनेचे चेअरमन सुनिल जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्प समन्वयक निलेश गोयथळे , आनंदवन बुध्द विहार आबलोली संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम कदम, सेक्रेटरी अविनाश कदम, उपसरपंच आशिष भोसले, ग्रामसेवक बी.बी. सुर्यवंशी, माजी सैनिक आणि बौद्धजन सहकारी संघाचे चेअरमन सुनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्या मिनल कदम, माजी सरपंच अल्पिता पवार, सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ पवार, गुहागरच्या समतादूत शितल पाटील, दापोलीच्या समतादूत माहेश्वरी विचारे, गुहागरच्या समतादूत शितल पाटील आदी उपस्थित होते. Training camp
