(निवोशी : श्री उदय गणपत दणदणे)
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील मासू गावतील तळ्याची वाडी येथील जेष्ठ कार्यकर्ते तसेच लोककलावंत गोविंद मास्कर ( बाबू तात्या ) यांचे शुक्रवारी, 11 मार्चला अल्पशा आजाराने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. मुंबईत ऑपेरा हाऊस येथील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. गोविंद मास्कर उर्फ बाबू तात्या नोकरी निमित्त मुबंई उपनगरात नालासोपारा येथे वास्तव्यास होते. यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मासू गावावर ऐन शिमगोत्सवात दुःखाच डोंगर कोसळला आहे. Tragic death of senior folk artist Maskar
ग्रामस्थांनी एकजूटीने कारभार करावा. यासाठी गोविंद मास्कर (बाबू तात्या) नेहमीच प्रयत्नशील राहिले. गावात सर्वांना आदराने मानसन्मान देणारे , स्मितहास्य, मनमिळावू स्वभावाचे सर्वांचे लाडके बाबू तात्या अर्थात गोविंद मास्कर हे अनेकांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व होते. गावातील रूढी परंपरा तसेच नमन व जाखडी नृत्य या लोककला जपल्या गेल्या पाहिजेत. गावागावातून नवनवीन तरुण कलाकार घडावेत. यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. तरुणांना प्रोत्साहन दिले. Tragic death of senior folk artist Maskar
आज लोककलावंताच्या न्यायहक्कांसाठी संपूर्ण कोकणभर जागर घालणारे लोककलावंत कवी/शाहीर श्री. सुधाकर मास्कर, कवी/शाहीर श्री. नितिन मास्कर , श्री. अशोक मास्कर, श्री. संजय मास्कर ( किरण) यांच्या सारखे अनेक कलाकार त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घडले. आज अनेक कलाकार त्यांच्या धाटणीत शिकून विविध ठिकाणी आपली कला सादर करत आहेत. Tragic death of senior folk artist Maskar
नाटक असो नमन, जाखडी नृत्य, नेहमी लोककलावंताच्या न्यायहक्कांसाठी पाठीशी राहणारे गोविंद मास्कर ( बाबू तात्या) स्वयंभू श्री सोमेश्वर नमन नाट्य मंडळ- मासू तसेच नमन लोककला संस्था (भारत) संलग्न- शाखा-गुहागर यात त्यांचा सक्रिय सहभाग राहून सभासद पदी ते कार्यरत होते. Tragic death of senior folk artist Maskar
अनेकांच्या सुख-दुःखात मदतीला धावून जाणारे गोविंद मास्कर (बाबू तात्या ) यांच्या अचानक जाण्याणे संपुर्ण मासू गावात शोक व्यक केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या दुःखात शोकाकुल समस्त मास्कर परीवार ,ग्रामविकास मंडळ- मासू तसेच नमन लोककला संस्था-शाखा-गुहागर सहभागी होते. कै. गोविंद मास्कर ( बाबू तात्या) यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. Tragic death of senior folk artist Maskar