सन्मित्र मंडळाचे आयोजन, उत्सव साधेपणाने करणार
गुहागर, ता. 01 : शहरातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लाकडी पुल येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे. याठिकाणी सन्मित्र मंडळातर्फे गेली 65 वर्ष परंपरागत शिवजयंती उत्सव (Traditional Shivjayanti in Guhagar) साजरा केला जातो. यावर्षीही अक्षयतृतीयेच्या आदल्या दिवशी म्हणजे 2 मे 2022 रोजी हा उत्सव होणार आहे. यावर्षी उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती सन्मित्र मंडळाचे सचिव प्रविण रहाटे यांनी दिली.

अक्षयतृतीयेच्या आदल्या दिवशी म्हणजे 2 मे रोजी सकाळी 8.00 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन करण्यात येणार आहे. सकाळी 9.00 श्रध्दांजली सभा, सकाळी 10.00 सत्यनारायणाची महापूजा व आरती, सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत तीर्थप्रसाद, सायंकाळी 5 वा, प.पू. कलावती आई परिवाराचे भजन, रात्रौ 9.30 वा. विविध मंडळांची सुस्वर भजने, रात्रौ. 11 वा. महाआरती असा कार्यक्रम आहे. तरी सर्व गुहागरमधील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाकरीता यावे असे आवाहन सन्मित्र मंडळाने केले आहे. (Traditional Shivjayanti in Guhagar)

यावर्षीच्या उत्सवाबाबत संस्थेचे सचिव प्रविण रहाटे म्हणाले की, दोन वर्ष कोरोनामुळे आम्ही साधेपणानेच उत्सव केला. यावर्षी मोठा उत्सव करावा असे सर्वांनाच वाटत होते. मात्र गेल्या वर्षभरात सन्मित्र मंडळाचे तरुण कार्यकर्ते, बुजुर्ग मार्गदर्शक आम्हाला सोडून गेले. यामध्ये दिगंबर चव्हाण, दीपेश फडतरे, लक्ष्मी बाळकृष्ण राऊत, जगन्नाथ कांबळे, गजानन बेंडल, गजानन (नाना) महाडीक, सुनंदा महाडीक, प्रकाश जगन्नाथ रहाटे, नानी तेलगडे आदींचा समावेश आहे. ही सगळी मंडळी गेली अनेक वर्ष या उत्सवामध्ये सहभागी असायची. सन्मित्र मंडळाच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मोठा उत्सव न करता या सर्व मंडळींचे स्मरण करुन साधेपणात उत्सव करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. (Traditional Shivjayanti in Guhagar)

या उत्सवाची निमंत्रणे दरवर्षीप्रमाणे पोचली नसली तरी हेच निमंत्रण समजून शहरातील नागरिकांनी तसेच तालुकावासीयांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज व सत्यनारायण महापूजचे दर्शनासाठी उपस्थित रहावे अशी विनंती प्रविण रहाटे यांनी केली आहे. (Traditional Shivjayanti in Guhagar)
