प्रकाश महाजन, कोकणचा पर्यटनात्मक विकास हे मनसेचे ध्येय
गुहागर, ता. 02 : पक्षप्रमुख राज ठाकरे हे निखारा आहेत. या निखाऱ्याची उब घ्यायला अनेकजण दिवसा, मध्यरात्री, पहाटे भेटून जातात. मात्र हा निखाऱ्याशी युती करण्यास कोणीही तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे. मनसैनिकांनी त्यासाठी तयार रहावे. असे प्रतिपादन मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केले. ते शृंगारतळीत पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. Tourism development of Konkan is MNS’s goal
गुहागर तालुक्यात सध्या मनसेचे नाका तेथे शाखा अभियान राबवविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून चिखली कारुळ फाटा येथील शाखेचे उद्घाटन मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केले. त्यानंतर शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात मनसेचा मेळावा झाला. यावेळी पडवे गटातील सुमारे १०० पेक्षा जास्त महिलांनी मनसेमध्ये प्रवेश केला. Tourism development of Konkan is MNS’s goal
यावेळी प्रकाश महाजन म्हणाले की, कोकणाने राज्याला नाथ पै, मधु दंडवते, शामराव पेजे, डॉ. तात्या नातू यांच्यासारखे नेते दिले. या मंडळींनी राजकारण करताना कोकणातील वातावरण बिघडवले नाही. आज मात्र कोकणातील वातावरण गढुळ बनले आहे. वर्षभर राज्यात शिमगाच सुरु असतो. महाराष्ट्रातील व्यावसायिकांनी मराठी पाट्या लावाव्यात असे राज ठाकरे म्हणाल्यावर टिका होते. पण यासंदर्भातील त्यांची भूमिका मराठी माणसाने समजून घेतली पाहीजे. कोकणाच्या पर्यटन विकासाबाबत मनसेची भुमिका स्पष्ट आहेत. कोकणात पर्यटन उद्योगावर आधारीत उद्योग यावेत. कोकणी उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण झाली पाहीजे. पर्यटन वाढेल असे धोरण सरकारने आखावे. मात्र, तसे झालेले नाही. राज ठाकरे यांनी पर्यटनात्मक विकास हे ध्येय बाळगून कोकणच्या विकासाचे रणशिंग फुंकले आहे. आगामी निवडणुकांमध्ये येथील जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सहकार्य करावे. लोकसभेचा उमेदवार वैभव खेडेकर व गुहागर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार प्रमोद गांधी अशी चर्चा सध्या सुरु आहे. परंतु निवडणुकीत कोणता उमेदवार द्यायचा याच्या निर्णयाचे सर्व अधिकारी राज ठाकरेंकडे आहेत. आपण उमेदवार कोण हे न पहाता मनसे पक्ष आणि पक्षचिन्ह सर्व मतदारांपर्यंत कसे पोचेल यासाठी मेहनत घ्यावी. राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर म्हणाले की, गेल्या 15 वर्षात एकही उद्योग येथे आला नाही. बेरोजगार तरुण, तरुणींना रोजगार देण्यासाठी मनसे कटिबध्द आहे. जनतेने मनसेचा उमेदवार निवडून द्यावा व विकास साधावा. संपर्क प्रमुख प्रमोद गांधी म्हणाले की, मनसैनिकांनी मत्स्य व्यवसायातील परप्रांतीय विक्रेते तसेच फिरते परप्रांतिय विक्रेते यांच्याविरोधात मोहीम उघडावी. Tourism development of Konkan is MNS’s goal
यावेळी मनसेचे जिल्हाचे उपाध्यक्ष विनोद जानवळकर, सरचिटणीस संतोष नलावडे, संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, महिला सेना सचिव अनामिका हळदणकर, गुहागरचे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या सह गुहागर, चिपळूण व खेडमधील पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते. Tourism development of Konkan is MNS’s goal