• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 April 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यात स्मार्ट कार्डसाठी टोकन मर्यादा

by Guhagar News
April 1, 2026
in Guhagar, Old News
16 0
0
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : तालुक्यात प्रवासी सेवा सुलभ करण्यासाठी स्मार्ट कार्ड जारी करण्याचे काम सुरू आहे, मात्र दररोज फक्त ७० टोकन मिळणे ही लोकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. याचा अर्थ, दिवसाला फक्त ७० प्रवाशांना स्मार्ट कार्ड घेता येते; जे पाहिले ७० प्रवाशी येतील, त्यांचे काम पूर्ण होते. उर्वरित लोकांना त्यांच्या वेळेवर काम होत नसल्याने परत जावे लागते. Token Limit for Smart Cards

गुहागर तालुका प्रवाशी संघटनेची भूमिका

गुहागर तालुका प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष श्री पराग कांबळे यांनी सांगितले की, तालुक्यात १२२ गावे, ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गट आहेत. सर्व प्रवाशांना, वयोवृद्ध नागरिकांना मुख्य कार्यालयात येणे ही मोठी अडचण आहे. यासाठी प्रत्येक गटात कॅम्प लावून प्रवाशांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून द्यावे. यामुळे प्रवाशांचा वेळ, शारीरिक त्रास आणि आर्थिक खर्च वाचेल. राज्य सरकारने या बाबत निश्चित धोरण ठरवावे. Token Limit for Smart Cards

“प्रवाशांसाठी ही सेवा सुलभ आणि सर्वसमावेशक असावी. मुख्य कार्यालयात येणे प्रत्येकासाठी सोयीचे नाही. तालुक्यातील प्रत्येक गटात कॅम्प लावल्यास वयोवृद्ध, आजारी आणि दूरच्या गावांतील नागरिकांना मोठा लाभ होईल,” असे श्री पराग कांबळे यांनी सांगितले. प्रवाशांचे हित साधण्यासाठी गुहागर तालुका प्रवासी संघटना या बाबत राज्य सरकारकडे योग्य ती मागणी करत आहे आणि सर्व प्रवाशांना माहिती देण्याचे काम करत आहे. Token Limit for Smart Cards

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarToken Limit for Smart Cardsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.