मुंबई, ता. 27 : पश्चिम आशियातील युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने आता रेशन दुकानावर केरोसिन वितरणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता प्रत्येक कुटुंबाला तीन लिटर केरोसिन दिले जाणार असून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय लागू केला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला केरोसिन पुरवठा रेशन दुकानांमध्ये पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे. Three liters of kerosene per family on ration
केंद्र सरकारकडून राज्य सरकारला रॅकिल पुरवठा करण्यात आला असून त्यानुसार राज्य गॅस सिलिंडर टंचाईमुळे राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथे लाभ नाही ! केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी एकूण ३,७४४ किलो लिटर केरोसिन मंजूर केले आहे. त्याचे जिल्हानिहाय वाटपाचे प्रमाण ठरवून देण्यात आले असून यामध्ये सर्वाधिक वाटप नाशिक (२२८ कि.लि.), अहिल्यानगर (२१६ कि.लि.) आणि पुणे ग्रामीण (२०४ कि.लि.) या जिल्ह्यांना करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर शहरांना यातून सध्या वगळण्यात आले आहे. सरकारने प्रति कुटुंब तीन लिटर केरोसिन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधा पत्रिकाधारकांना पहिले प्राधान्य दिले जाईल. पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही त्याचा लाभदिला जाईल. विशेष ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांनाही केरोसिन देण्यात येणार असून अशा लाभाथ्यर्थ्यांना ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला सादर करावा लागेल. Three liters of kerosene per family on ration

स्थलांतरित मजूरदेखील ओळखपत्राचा पुरावा दाखवून या लाभास पात्र ठरणार आहेत. वितरणाचे नियम आणि अटी प्रत्येक कुटुंबाला किंवा प्रत्येक शिधापत्रिकेला तीन लिटर केरोसिन दिले जाईल. हे वाटप मार्च-एप्रिल मार्च-एप्रिल या कालावधीसाठी असून, ४५ दिवसांच्या आत आपापला साठा उचलणे बंधनकारक आहे. त्याचा लाभ पुढील महिन्यात दिला जाणार नाही. रेशन दुकानदारांना केरोसिन वितरणाची नोंद ऑफलाइन नोंदवहीमध्ये ठेवणे अनिवार्य आहे. एखाद्या गावात केरोसिन विक्रेता उपलब्ध न झाल्यात शेजारी गावातून त्यांना केरोसिन उपलब्ध करून दिले जाईल. वाहतूक दरात तसेच किरकोळ विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये सुधारणा करण्याची शासनदरबारी विचाराधीन असून त्यानुसार स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. Three liters of kerosene per family on ration
वितरकांनी संबंधित जिल्ह्यांकरिता निर्धारित केलेल्या तेल कंपनीच्या जवळच्या केरोसिन डेपोमधून जिल्हानिहाय वाटपानुसार निश्चित केलेले केरोसीन उचलण्याचे आदेश दिले आहेत. पेट्रोल किंवा डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी रॉकेलचा वापर होऊ नये, याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. अनधिकृत विक्री किंवा गैरवापर आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. Three liters of kerosene per family on ration
