एकीकडे भारताला अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक
नवीदिल्ली, ता. 13 भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हा तणाव अधिक वाढत चालला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. परंतु अद्यापही पाकिस्तानचे अधिकारी सुधारलेले नाहीत. एकीकडे हे अधिकारी भारताला अणुहल्ल्याची धमकी देत आहेत. मात्र दुसरीकडे पाकिस्तान पाण्याच्या थेंबा थेबांसाठी भारतापुढे गयावया करत आहेत. Threat on one side, begging on the other
पाकिस्तानने भारताकडे पुन्हा एकदा सिंधु पाणी करारावरील स्थगिती हटवण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सिंधू जल कराराच्या पूर्ण अंमलबजावणीचे आणि लवाद न्यायालयाच्या स्पष्टीकरणाचे स्वागत केले आहे. पण, अद्याप भारताने लवाद न्यायालयाला मान्यता दिलेली नाही, तसेच न्यायालयाच्या कारवाईला देखील मान्यता दिलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने, भारताला सिंध पाणी करार त्वरित पूर्ववत करण्याचे आवाहन केले आहे. भारताने या कराराच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण कराव्यात असे म्हटले आहे. Threat on one side, begging on the other

पाकिस्तानने Court of Abitration च्या बेवसाइटवर प्रसिद्ध झालेल्या सिंधू पाणी कराराच्या अहवालाचे स्वागत केले आहे. या अहवालात चिनाब, झेलम आणि सिंधू नद्यांवर बांधण्यात आलेल्या नवीन जलविद्युत प्रकल्पाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानला कोणत्याही अडथळ्यांशिवाय पाणी पोहचवावे असे सांगण्यात आले आहे. तसेच या कराराचे नियम भारताने पाळले पाहिजेत असे सांगण्यात आले आहे. यामध्ये भारताने या नद्यांवर निर्माण केले अडथळे भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणी करारचे मोठे उल्लंघन असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. Threat on one side, begging on the other
याचवेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो भारताला अणु हल्ल्याची धमकी देत आहेत. असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान दुसऱ्यांदा भारतासह संपूर्ण देशाला अणु हल्ल्याची धमकी दिली आहे. सिंधु पाणी करारावरुनही भारताविरोधी विधान केले आहेत. तसेच बिलावल भुट्टो यांनी देखील सिंधु पाणी करारावरुन भारताला युद्धाची धमकी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधी कारवाई केली होती. यावेळी देखील पाकिस्तानच्या अणु हल्ल्याच्या धमक्या सुरुच होत्या. ही पाकिस्तानची एक जुनी सवय आहे. सतत अण्वस्त्रांच्या हल्ल्याची धमकी पाकिस्तानी अधिकारी देत राहतात. परंतु भारताने पाकिस्तानच्या या धमक्यांना बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. Threat on one side, begging on the other