Indian Badminton Teams Historic Victory
भारताने 14 वेळा अंजिक्य राहीलेल्या इंडोनेशियन टीमचा 3-0 ने पराभव करत बॅटमिंटनमधील प्रतिष्ठेचा थॉमस कप (Thomas Cup) जिंकला. थॉमस कप स्पर्धेच्या 73 वर्षांत प्रथमच हा चषक जिंकून भारतीय टीमने इतिहास (Historic Victory) रचला आहे. भारतीय टीमने (Indian Team) मिळविलेल्या सांघिक यशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), क्रीडा मंत्रालय यांच्यासह देशातील अनेक खेळाडूंनी अभिनंदन केले आहे. (Indian Badminton Teams Historic Victory)
बॅडमिंटन खेळातील सर्वात प्रतिष्ठेच्या थॉमस कप (Thomas Cup) स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे या खेळात एका टीममधील सर्व खेळाडूंची एकेरी आणि दुहेरी स्पर्धेतील कामगिरी सर्वोत्तम असावी लागते. तरच थॉमस चषकाला गवसणी घालता येते. आजपर्यंत 73 वर्षांच्या इतिहासात भारत कधीही अंतिम फेरीत पोचला नव्हता. यावर्षी किदम्बी श्रीकांत, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टी, लक्ष्य सेन हे विजयाचे शिल्पकार ठरले. इंडानेशिया, चीन, जपान, डेन्मार्क आणि मलेशियानंतर थॉमस कप जिंकणारा भारत 6 वा देश बनला आहे. (Indian Badminton Teams Historic Victory)
Indian Badminton Teams Historic Victory
Thomas Cup अंतिम स्पर्धेतील भारताचा पहिला सामना लक्ष्य सेन आणि इंडानेशियाच्या अँथोनि सिनिसुका गिटींग यांच्यात झाला. पहिला गेम (8-21) हरल्यानंतर लक्ष्य सेनने अँथोनिचा 21-17 आणि 21-16 असा पराभव केला.
दुहेरीच्या सामन्यात सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान आणि केविन संजय यांचा 18-21, 23-21(दुसरा गेम इंडानेशियाने जिंकला) आणि 21-19 असा पराभव केला.
पाच सामन्यांपैकी एकेरी आणि दुहेरी या दोन सामन्यात भारताने विजय मिळविला होता. त्यामुळे स्वाभाविकच आता तिसरा सामना महत्त्वपूर्ण होता. तिसरा एकेरी सामना किदम्बी श्रीकांत आणि जोनाथन ख्रिस्टी यांच्यात रंगला. पहिला गेम 21-13 असा श्रीकांत जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये ख्रिस्टीने दमदार खेळ केला. ख्रिस्टी दुसरा गेम जिंकणार असे वाटत असतानाच श्रीकांतने हा गेम 18-18 असा टाय केला. तिसऱ्या गेममध्ये श्रीकांत ताकदीनिशी उतरला आणि 23-21 अशा गुणांनी या सामन्यात विजय मिळविला. त्यामुळे 3-0 अशी आघाडी घेत भारताने 73 वर्षांनी प्रथमच थॉमस कप जिंकण्याचा इतिहास रचला.
भारतात आनंदाची लाट उसळली
भारतीय टीमने थॉमस चषक जिंकल्यानंतर भारतात आनंदाची लाट उसळली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थॉमस चषक जिंकणाऱ्या टीमचे अभिनंदन केले.
भारतीय क्रीडा मंत्रालयाने विजेत्या टीमला 1 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले. भारतीय क्रिक्रेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, गौतम गंभीर, बॅडमिंटनमधील फुलराणी म्हणून ओळखली जाणारी साईना नेहवाल, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, किरण रिजिजू, परराष्ट्र खात्याचे अधिकारी डॉ. जयशंकर, आदी अनेक मान्यवरांनी भारतीय टीमचे अभिनंदन केले आहे.