राज्यात २७ ते ३० जूनला पावसाचा जोर असणार
मुंबई, ता. 26 : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर असणार आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे वाहणार आहेत. २६ ते ३० जून दरम्यान राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच २७ ते ३० जूनला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे. There will be heavy rain for next five days

उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर असणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. नाशिकमध्ये रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. नाशिक घाटमाथ्याला गुरुवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. यामुळे गोदा घाट परिसरात पाण्याची पातळी कमी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात चार दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील. परंतु पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. There will be heavy rain for next five days

मराठवाड्यात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस असणार आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात मागील दोन आठवड्यापासून दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने तालुक्यातील खरीप हंगामातल्या जवळपास 35 हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. विदर्भात अजून पावसाने जोर घेतला नाही. यामुळे या भागातील पाणीप्रश्न गंभीर होत आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दळी मारलेला पाऊस गुरुवारी सुरु झाला. या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. There will be heavy rain for next five days