रवींद्र मटकर, लोककला मान्यतेसाठी संस्थेचे प्रयत्न
गुहागर, दि. 25 : रंगभूमीवर इतर कला सादरीकरणाला जो हक्क दिला जातोय, तोच हक्क आमच्या नमन लोककलेलाही मिळावा. अशी मागणी नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष यांनी रविंद्र मटकर यांनी मुंबईतील दामोदर नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांकडे केली आहे. कोरोनाच्या संकटानंतर सध्या नमन लोककला पहाणाऱ्यांची संख्या मुंबईत वाढत आहे. त्यामुळे नमन लोककला संस्थेतर्फे अधिकाधिक प्रयोग लावून या कलेच्या प्रसाराचे धोरण आखण्यात आले आहे. यामध्ये नाट्यगृहांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. Theaters should cooperate for Naman

नाट्यसंस्थांच्या वेळामध्ये वाढ केली जाते मात्र नमन संस्थेला जादा वेळासाठी दंडासहीत भाड्याची आकरणी केली जाते. ही गोष्ट लक्षात आल्यावर नमन लोककला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्यगृह व्यवस्थापकांच्या भेटी घेण्यास सुरवात केली आहे. Theaters should cooperate for Naman
मुंबईतील दामोदर नाट्यगृह, परेलच्या व्यवस्थापकीय मंडळाची भेट यानिमित्ताने घेण्यात आली. त्याच्यासोबत चर्चा करताना नमन ही लोककला रत्नागिरीमधील कलाकारांनी जपली आहे. या कलेचा प्रसार झाला तरच महाराष्ट्राची लोककला म्हणून आम्हला राज्यमान्यता मिळू शकते. त्यासाठी नाट्यगृह व्यवस्थापनाने सहकार्य करावे. नाटके तसेच अन्य कार्यक्रम सादर करणाऱ्या लोकांना वाढीव वेळ दिला जातो. Theaters should cooperate for Naman
त्याचप्रमाणे नमन कार्यक्रमाचे सादरीकरण करताना ठरलेल्या वेळात वाढ झाली तर सवलत द्यावी. भाडे व दंड आकारु नये. अशी विनंती नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मटकरी यांनी केली. दामोदर नाट्यगृह व्यवस्थापनानेही याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. असे आश्र्वासन दिले. Theaters should cooperate for Naman
या बैठकीला नमन लोककला संस्थेचे सचिव सुधाकर मास्कर, उपाध्यक्ष रमाकांत जावळे, चंद्रकांत साळवी, सौ. संगीता पांचाळ-बलेकर, कार्यकारीणी सदस्य उदय दणदणे, विजय साळवी, सुभाष धनावडे, अमित काताळे, शशिकांत भारती, दिपक वेलुंडे, सुरेश मांडवकर आदी उपस्थित होते. Theaters should cooperate for Naman

