मुकुंद मराठे; 2024 मध्ये संगीत नाटकांच्या स्पर्धा घ्या
गुहागर, ता. 12 : या रंगभुमीला रंगदेवतेचा आशीर्वाद आहे. गोविंदरावांची कर्मभुमी असलेली रंगभूमी सर्व प्रकारच्या नाटकांचे सादरीकरण करण्यासाठी सुसज्ज व्हावी (theater should be equipped). असे प्रतिपादन गायक अभिनेते मुकुंद मराठे यांनी केले. ते श्री देव कोपरी नारायण देवस्थान आयोजीत संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यात बोलत होते. theater should be equipped
मुकुंद मराठे म्हणाले की, कोकणात आजही संगीत नाटक जीवंत आहे. हे आजच्या स्पर्धेने दाखवून दिले आहे. गोविंदराव म्हणतील की कोकणाने माझं संगीत नाटक जीवंत ठेवलयं. इतके अनुभवसंपन्न संगीत नाटक कलाकार या कोकणात आहेत. एकापेक्षा एक गायक गायिका इथे तयार होत आहेत. अनेकांचे कुलदैवत गुहागरात आहे तसेच आमचे सांगितिक कुलदैवत गुहागरात आहे. 4 जानेवारी 2023 पासून विद्याधर गोखले यांची जन्मशताब्दी सुरु होत आहे. ऑक्टोबर 2023 पासून पं. राम मराठे, एप्रिल 2023 पासून पंडीत कुमार गंधर्व आणि सप्टेंबर 2024 पासून गोविंदराव पटवर्धन यांची जन्मशताब्दी सुरु होत आहे. 2024 मधील काही काळ या सर्वांच्या जन्मशताब्दीचा एकत्रित आहे. या निमित्ताने या ठिकाणी प्रकाश योजना, ध्वनी व्यवस्था आदींनी सुसज्ज असं थिएटर व्हावे. त्यासाठी आवश्यक सहकार्य आम्ही निश्चित करु. त्यावर्षी कार्तिकोत्सवात देवस्थानने संगीत नाट्यमहोत्सव भरवावा. पं. गोविंदरावांच्या स्मरणार्थ ऑर्गन व हार्मोनियम वादनाच्या स्पर्धा घ्याव्यात.theater should be equipped
ज्ञानेश पेंढारकर म्हणाले की, कोपरी नारायण देवस्थानच्या पंचांनी एकजुटीने व एकदिलाने उत्कृष्ठ नियोजनातून ही स्पर्धा आयोजीत केली. त्याला संगीत नाट्यकलाकारांनी, संस्थांनी साथ दिली. हे कौतुकास्पद आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या (State Musical Drama Competition) आयोजकांनी ही बाब लक्षात घ्यावी. राज्य नाट्य स्पर्धेची तुलना या स्पर्धेशी करता येणार नाही. तरीही काही गोष्टींचा विचार केला तर या स्पर्धेने बाजी मारली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. theater should be equipped
या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे म्हणाले की, या रंगभुमीच्या (Rangbhumi) उभारणीत गोविंदरावांचा मोठा वाटा आहे. या रंगभुमीला रंगदेवतेचा आशीर्वाद असल्याने कोणताच नाट्यप्रयोग (marathiplay) पडत नाही. याचा अनुभव 23 वर्ष मी स्वत: घेतला आहे. येथे सुसज्ज रंगमंच व्हावा यासाठी दुर्गादेवी देवस्थान तनमनधनपूर्वक मदत करेल. theater should be equipped