नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांचे गौरवोद्गार
गुहागर, ता. 02 : महाराष्ट्र भूषण आणि थोर निरुपणकार डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. The work of Shri members is an example for society

महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त, थोर समाज सेवक, महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदस्यांच्या वतीने चिपळूण शहरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या श्री सदस्यांनी ओला कचरा 550 किलो, सुका कचरा 3955 किलो, एकूण 5467 किलो गोळा करून नगर पालिकेच्या कचरा संकलन डेपोमध्ये पोहच केला. कचरा संकलनसाठी गोण्या चिपळूण शहरातील व्यावसायिकांनी पुरवल्या, नगर पालिका आणि श्री सदस्यांनी कचरा वाहतूकीसाठी वाहने देऊन सहकार्य केले. The work of Shri members is an example for society
सकाळी 7.30 ते 11 या वेळेत पार पडलेल्या या मोहिमेत शेकडो श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य रस्ते व विविध महत्त्वाची शासकीय ठिकाणे, बस स्थानक स्वच्छ करण्यात आली. “श्री सदस्यांनी ज्या शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने चिपळूण शहर स्वच्छ केले, ते पाहून मनापासून अभिमान वाटतो. त्यांच्या कामाचे करावे, तेवढे कौतुक थोडे आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेले संस्कार आणि समाजसेवेचा संदेश आजही त्यांच्या कार्यातून जिवंत असल्याचे दिसते,” असे ते म्हणाले. The work of Shri members is an example for society

ते पुढे म्हणाले, “नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणारे वृक्षारोपण उपक्रमही प्रेरणादायी आहेत. केवळ वृक्ष लावून थांबणे नाही, तर स्वतःच्या घरातून पाणी आणून ती झाडे जगविण्याची जबाबदारी श्री सदस्य घेतात, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. स्वच्छता आणि आरोग्य या क्षेत्रात त्यांनी उभा केलेला आदर्श समाजासाठी मार्गदर्शक आहे.” The work of Shri members is an example for society
नगराध्यक्षांनी नागरिकांनाही आवाहन केले की, “शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगर परिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची कर्तव्यभावना आहे. श्री सदस्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी स्वच्छ आणि सुंदर चिपळूण घडविण्यास हातभार लावूया.” The work of Shri members is an example for society

नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षांच्या हस्ते श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव यांनीही मनोगतात प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला., यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक अंकुश आवले, कपिल शिर्के, वैशाली कदम, शिल्पा देसाई, अजय भालेकर, नसरीन खडस, शहनाज वांगडे, नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी आणि श्री सदस्य स्वच्छता अभियान समारोप कार्यक्रमाला उपस्थित होते. आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी नगर परिषदेच्या वतीने प्रतिष्ठान चे आभार मानले. तर प्रतिष्ठान च्या कार्याविषयी प्रास्ताविक आणि मान्यवरांचे आभार श्री सदस्य मनोज पवार यांनी केले. The work of Shri members is an example for society
