• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सुरक्षा दलांनी केला दहशतवाद्यांचा खात्मा

by Guhagar News
October 10, 2023
in Bharat
123 1
6
The security forces eliminated the terrorists
242
SHARES
691
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्रीनगर, ता. 10 : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील अलशिपोरा येथे आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक काश्मिरी पंडिताच्या हत्येत सामील होता, अशी माहिती समोर आली आहे. The security forces eliminated the terrorists

चकमकीनंतर जवानांकडून परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. याआधी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. गेल्या बुधवारी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी मारले गेले होते. बासित अमीन भट आणि साकिब अहमद लोन अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दोघेही कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. एका पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील कुज्जरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. The security forces eliminated the terrorists

माहिती मिळताच सुरक्षा दलानी परिसराला घेराव घालत शोधमोहिम सुरू केली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी सुद्धा या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी ठार झाले झाले. घटनास्थळावरून त्यांचे मृतदेह सापडल्याचे प्रवक्त्याने सांगितले. ते म्हणाले की घटनास्थळावरून दोषी कागदपत्रे, शस्त्रे आणि काडतुसे आणि एके सिरीजच्या दोन रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी हे मोठे यश असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाचे अभिनंदन केले. The security forces eliminated the terrorists

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe security forces eliminated the terroristsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share97SendTweet61
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.