मुलीची हुशारी व पोलीसांच्या पाठपुराव्यामुळे आरोपी गजाआड
गुहागर, ता. 09 : तोतया पोलीस असल्याचे भासवून एका अल्पवयीन मुलीचे लैगिंक शोषण करण्याचा उमेश शिगवणचा (वय 26, रा. निगुंडळ) डाव फसला. सदर मुलीने हुशारी दाखवत त्याचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यामुळे पोलीसांनी त्याला शोधुन अटक केली आहे. The plot of sexual exploitation failed
The plot of sexual exploitation failed
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर एक अल्पवयीन मुलगी मंगळवारी (ता. 04) दुपारी मित्रासोबत फिरायला आली होती. यावेळी उमेश शिगवण तिला हेरले. पोलीस असल्याची बतावणी केली. तु माझ्यासोबत पोलीस ठाण्यात चल असे सांगत उमेश तिला पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर घेवून आला. तिथे आल्यावर गुहागरचे पोलीस कडक आहेत ते तुला तुरुंगात टाकतील. त्यापेक्षा आपण शृंगारतळीच्या पोलीस ठाण्यात जावू या तिथेल पोलीस चौकशी करुन तुला घरी सोडतील. असे उमेशने मुलीला सांगितले आणि तिला रिक्षात बसवून शृंगारतळीकडे रवाना झाला. पाटपन्हाळे कॉलेज जवळ आल्यावर उमेशने रिक्षा सोडून दिली. मुलीला सांगितले की आता माझी ड्यूटी संपत आहे. पुढची ड्यूटी करणारा पोलीस इथे रहातो. त्याच्याकडे आपण जावू. त्यानंतर तुला आम्ही सोडून देवू. असे सांगून पाटपन्हाळे कॉलेज परिसरातील निर्जन जंगल भागात उमेश तिला घेवून गेला. तिथे गेल्यावर तुला सोडण्यासाठी तुला मला काय देशील असे विचारात उमेशने सदर मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. आपल्याबाबतीत काहीतरी चुकीचे घडत आहे हे लक्षात आल्यावर सदर मुलीने तिथून पळ काढला आणि ती गुहागर शृंगारतळी या रहदारीच्या रस्त्यावर आली. आता आपण मुलीला पकडू शकत नाही म्हटल्यावर उमेशने तेथून काढता पाय घेतला. The plot of sexual exploitation failed
The accused was arrested
सदर मुलगी घरी उशिरा पोचली म्हणून पालकांनी चौकशी केली. त्यावेळी आपल्याला एक पोलीसाने पकडले व तो पोलीस ठाण्यात घेवून जात होता. असे मुलींने सांगितले तसेच उमेशचा मोबाईल क्रमांकही दिला. मग पालकांनी गुहागर पोलीस ठाण्यातील ओळखीच्या पोलीसांना तीनवेळा फोन करुन ही गोष्ट विचारली. सदर बाब प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुतेंना समजल्यावर त्यांनी अधिकची चौकशी सुरु केली. सदर मुलीच्या पालकांना विश्र्वासात घेवून संपूर्ण हकिगत विचारुन घेतली. गंभीर बाब समोर आल्यावर पुन्हा पालकांना तक्रार करण्याची विनंती केली. पालकांनी तक्रार केल्यानंतर चार पोलीसांची टीम उमेश शिगवणच्या मागावर गेली. दसऱ्याच्या दिवशी (ता. 5) दिवसभर उमेश घरी गेलाच नव्हता. शोध सुरु असताना गुरुवारी (ता. 6) सायंकाळी पोलीसांनी त्याला एक मंदिरात पकडले. पोलीसी हिसका दाखवताच उमेश शिगवणने गुन्हाची कबुली दिली. उमेश शिगवणवर भादवी कलम 354, 354 (ड), 363, 366 आणि लैगिंक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियमानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. The plot of sexual exploitation failed
