सार्वजनिक बांधकामच्या प्रयत्नांनी मोहिम फत्ते
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील मोडकाआगर हेदवी मार्गावर अडूर नागझरी दरम्यान एका वडाच्या झाडाने गुरुवारी प्रशासनाची चांगलीच दमछाक केली. 2 जूनला सकाळी जुनाट वडाच्या झाडाची मोठी फांदी कोसळली. अजस्त्र वडाच्या खोडाला रात्री आग लागली होती. (The Old Tree Caught Fire) त्यामुळे वड आतून धुमसत होता. दुपारी पुन्हा एक फांदी रस्त्यावर कोसळली. सायंकाळी झाड पेटू लागले. गुरुवारी (ता. 2 जून) रात्री 9 च्या सुमारास हा जुनाट वड समुळ उखडून बाजुला करण्यात आला. या प्रक्रियेमध्ये शासनाची चांगलीच दमछाक झाली. The Old Tree Caught Fire
गुरुवार 2 जूनला सकाळी 7.30 वा. आपत्ती व्यवस्थापन कक्षात निरोप आला. अडूर नागझरी दरम्यान रस्त्यावर जुनाट अजस्त्र वडाची मोठी फांदी कोसळली आहे. रस्त्यावरील वहातूक बंद झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने बांधकाम खात्याशी संपर्क साधला. तातडीने बांधकाम खाते कामाला लागले. पुढील तासाभरात रस्ता वहातुकीसाठी मोकळा झाला. हा विषय संपला असे समजून सगळे अन्य कामाला लागले. (The Old Tree Caught Fire)
गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास अडूरचे तलाठी विजय अवेरे यांनी पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला निरोप दिला की, रस्त्यावर पडलेले वडाचे झाड बाजुला करण्यात आले आहे. परंतु उर्वरित उभे असलेले झाड केव्हाही पडू शकेल आणि पुन्हा रस्ता बंद होईल. तरी हे झाड बाजुला करावे. या संदेशाबरोबरच तलाठ्यांनी त्या वडाला एका बाजुने लागलेल्या आगीचे फोटोही पाठवून दिले होते.
गुरुवारी दुपारी 4 च्या दरम्यान त्याच वडाच्या झाडाचा आणखी काही भाग रस्त्यावर कोसळला आणि वहातूक ठप्प झाली. पुन्हा यंत्रणेची धावपळ सुरु झाली. तासाभरात रस्ता मोकळा करण्यात आला. (The Old Tree Caught Fire)
सार्वजनिक बांधकामचे परिश्रम
आता बांधकाम विभागाने हा जुनाट वृक्ष समुळ उखडून टाकण्याचा निर्णय घेतला. एका बाजुला झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरु होते. त्याचवेळी सायंकाळच्या वाऱ्यावर वडाच्या खोडाला आतुन लागलेली आग वाढू लागली होती. सायंकाळी 7 च्या सुमारास जुनाट वडाने पेट घेतला. अखेर बांधकाम विभागाने पोलीसांची मदत घेवून या रस्त्यावरील वहातूक अन्य मार्गाने वळवली. जेसीबीच्या साह्याने वडाच्या पारंब्या आणि फांद्या तोडून पेटणारे खोड मोकळे करण्यात आले. त्यानंतर पेटणाऱ्या खोडाचा भाग हळुहळु तोडण्यात आला. दुपारी 4.30 ते रात्री 10.30 या सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बांधकाम विभागाला पेटणारा जुनाट वड समुळ उखडून बाजुला करण्यात यश आले. यावेळी बांधकामच्या उप अभियंता सलोनी निकम, शाखा अभियंता निजसुरे, कनिष्ठ अभियंता घोरपडे, जेसीबी चालक आणि अडूरमधील ग्रामस्थ उपस्थित होते. (The Old Tree Caught Fire)
आपत्ती नव्हे मानवनिर्मित आग (हेडिंग ३ बनवावे) सदर वडाच्या झाडाला लागलेली आग ही आपत्ती नव्हती तर माणसांनी लावली होती. बुधवारी (1 जुनला) काहीजण याच वडाच्या झाडाखाली पार्टीसाठी बसले होते. त्यांनीच गंमत म्हणून या ठिकाणी शेकोटी पेटवली. पार्टीनंतर ही मंडळी निघुन गेली. मात्र शेकोटीने वडाच्या झाडाला आग लागली. अशी माहिती स्थानिकांनी दिली. (The Old Tree Caught Fire)