पालकांसह नागरिकांनी सोडला सुटकेचा श्र्वास
गुहागर, ता. 8 : शहरातील गुहागर हायस्कुलमध्ये शिकणारी दोन मुले शाळा सुटल्यानंतर घरी परत आली नाहीत (The Missing children Found). रात्री उशिरापर्यंत मुलांचा ठावठिकाण न लागल्याने पालकांनी ही गोष्ट गुहागर शहरातील कुलस्वामिनी चौकातील काही मंडळींना सांगितली. शोध सुरु झाला. अखेर ही मुले चिपळूण तालुक्यात सापडली. शुक्रवारी 8 जुलैला रात्री 11.15 च्या दरम्यान पोलीसांनी मुलांना ताब्यात घेतले आणि पालकांसह कुलस्वामिनी चौकातील नागरिकांनी सुटकेचा श्र्वास सोडला. The Missing children Found

याबाबत घटनेबाबत शनिवारी 9 जुलैला पोलीसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर संबंधित घटना अधिक स्पष्ट होईल. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुहागर कुलस्वामिनी चौक परिसरात रहाणारी दोन शाळकरी मुले शुक्रवारी 8 जुलैला शाळा सुटल्यानंतर घरी परत आली नाहीत. कदाचित मित्रांबरोबर ही मुले खेळायला गेली असतील असे समजून पालकांनीही फारशी हालचाल केली नाही. मात्र रात्री 8 वाजून गेले तरी मुले घरी न आल्याने पालकांनी या मुलांच्या घरी चौकशी करण्यास सुरवात केली. सर्व ठिकाणाहून नकार आल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आले. मग पालकांनी कुलस्वामिनी चौकातील काही नागरिकांच्या कानावर हा विषय घातला. मुलांची शोधाशोध सुरु झाली. नागरिक व पोलीसांद्वारे शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. त्यावेळी गुहागर आरे मार्गावरील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायकल घेवून दोन मुले रानवीच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आले. बेपत्ता झालेली मुले हीच असल्याचे नक्की झाले. शोध रानवीमार्ग शृंगारतळीच्या दिशेने सुरु झाला. The Missing children Found
(यापुढील घटना कथित गोष्टीवर आधारीत आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. शनिवारी नागरिक व पोलीसांकडून माहिती मिळाल्यावरच याबाबतीत विश्र्वासार्हता समजू शकते)
The Missing children Found
शृंगारतळीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील ही मुले दिसली असावीत असा अंदाज आहे. काहीच्या म्हणण्याप्रमाणे ही मुले शृंगारतळीतून एक मोटरसायकल घेवून चिपळूणला गेली. सदर मोटरसायकलस्वाराने आपली गाडी चोरीला गेल्याची तक्रार पोलीसांकडे दिली. मोटरसायकल चोरीचा संदेश सर्व पोलीस ठाण्यांपर्यंत पोचल्याने चिपळूणचे पोलीस सतर्कत होते. ही शाळकरी मुले मोटरसायकल घेवून चिपळूण (शहरात की अन्य ठिकाणी हे निश्चित माहिती नाही) परिसरात पोचल्यावर तेथील पोलीसांना संशय आला. अधिक चौकशी केल्यावर ही दुचाकी शृंगारतळीमधील असल्याचे उघड झाले. तसेच ही मुले पळून आल्याचेही पोलीसांच्या लक्षात आले. The Missing children Found

याच दरम्यान गुहागर कुलस्वामिनी चौकातील तरुणांचा एक गट मुलांना शोधण्यासाठी चिपळूणपर्यंत पोचला होता. चिपळूण पोलीसांच्या ताब्यात असलेली मुले ही गुहागरमधुन बेपत्ता झाल्याची खातरजमा झाली. रात्री 11.15 च्या दरम्यान मुले चिपळूणात सापडल्याचा संदेश पालक आणि स्थानिक शोधकर्त्यांपर्यंत पोचला आणि सर्वांनीच सुटकेचा श्र्वास सोडला. The Missing children Found
रात्री उशिरा या मुलांना गुहागर पोलीस ठाण्यात आणले जाणार आहे. तेथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या मुलांना पालकांच्या ताब्यात दिले जाईल.
