गुहागर, ता. 18 : के. जे. सोमैया आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या इंग्रजी विभागातर्फे, मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या सहकार्याने, मराठी कादंबरी शेवटची लाओग्राफिया या डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर द लास्ट फोकटेल चा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन आणि स्वागत सोहळ्याने झाली. The Last Folktale
यावेळी डॉ. सत्यवान यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किसन पवार यांनी कार्यक्रमाच्या विषयाचे आणि महत्त्वाचे विवेचन केले. मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. सचिन लबडे यांनी या कादंबरीविषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “ही कादंबरी सर्जनशील, प्रेरणादायी आणि उत्तरआधुनिक आहे. जीवनातील संघर्षांचे तीव्र, जिवंत चित्रण या कादंबरीत आढळते. तिची सत्यता आणि कल्पनाशक्ती वाचकांना खोलवर भिडते.” लेखक डॉ. बाळासाहेब लबडे यांनी आपल्या सर्जनशील प्रक्रियेविषयी सांगताना म्हटले –

“या कादंबरीतील ९० टक्के आशय हा वास्तवावर आधारित आहे आणि १० टक्के कल्पित आहे. मी वास्तव अनुभवांना व्यंग, विविध कथनशैली आणि जिवंत व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सर्जनशीलतेत रूपांतरित केले आहे.”कादंबरीचे इंग्रजी भाषांतर करणारे प्रख्यात अनुवादक डॉ. विलास सालुंखे यांनी भाषांतराच्या आव्हानांबद्दल सांगितले –“द लास्ट फोकटेल चे भाषांतर करताना अनेक सांस्कृतिक संदर्भांचा अनुवाद करणे मोठे आव्हान होते. मी भाषांतरात फुटनोटसचा वापर टाळला, कारण त्या वाचनप्रवाहात अडथळा निर्माण करतात. त्याऐवजी संदर्भानुसार अर्थ स्पष्ट करून कादंबरीचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील तसेच परदेशातील मराठीबाह्य वाचकांनाही ही कादंबरी समजेल आणि आवडेल, अशी अपेक्षा आहे.” The Last Folktale

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आणि विशेष अतिथी जेरी पिंटो यांनी या कादंबरीचे कौतुक करताना म्हटले – “द लास्ट फोकटेल ही हजारांमधली एक दुर्मीळ कादंबरी आहे. ती नाविन्यपूर्ण, अरेखीय आणि खऱ्या अर्थाने उत्तरआधुनिक आहे. प्रत्येक पुस्तक हे एक आव्हाण आणि एक संवेदनशील दस्ताऐवज असते, जे आपल्या हृदयाला आणि भविष्याला नव्याने लिहू शकते. ही कादंबरी वाचकांना बदलण्याची आणि त्यांच्या जीवनात नव्या अर्थाने प्रकाश आणण्याची क्षमता बाळगते.” The Last Folktale
पिंटो यांनी वार्षिक अंक आणि इंग्रजी वांग्मय मंडळ उद्घाटनावेळी आजच्या डिजिटल युगातील वाचन संस्कृतीबद्दल बोलताना म्हटले –“आज अनेक शिक्षक आणि विद्यार्थी ग्रंथालयापासून दूर राहतात आणि गुगलवर अवलंबून असतात. अभ्यासक्रमाबाहेरील पुस्तक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे – तेच खरे शिक्षणाचे खजिना आहे. विचार ही बीजे आहेत; जेव्हा त्यांना पुस्तकांच्या माध्यमातून वाढवले जाते, तेव्हा ती कल्पनाशक्ती आणि विचारांच्या जंगलात रूपांतरित होतात. आपल्या देशाला अशाच विचारवंतांची आणि दूरदर्शी मनांची गरज आहे.” The Last Folktale

प्रसिद्ध मराठी लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी द लास्ट फोकटेल वाचण्याचा अनुभव एका अमूर्त चित्राकडे पाहण्यासारखा असल्याचे सांगितले –“अमूर्त चित्राप्रमाणे ही कादंबरी मानवी जीवनातील सूक्ष्म आणि गूढ सत्ये उलगडते. ती पूर्ण समजून घेण्याची मागणी करत नाही, पण ती वाचकाला मंत्रमुग्ध करते आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करते. प्रत्येक वाचक आपल्या संवेदनशीलतेनुसार तिचा अर्थ वेगळा काढेल. The Last Folktale ही आधुनिक साहित्यातील अत्युत्कृष्ट आणि लक्षणीय निर्मिती आहे.” कार्यक्रमाचा समारोप के. जे. सोमैया आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या इंग्रजी विभागाच्या वतीने आभार प्रदर्शनाने झाला. The Last Folktale