• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नगरसेवकांचे पती करतात ढवळाढवळ

by Guhagar News
February 9, 2022
in Guhagar
16 0
0
The husband of the corporator intervenes

The husband of the corporator intervenes

31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सभेत कर्मचाऱ्यांनी मांडली व्यथा ; नगराध्यक्षांनी घातले लक्ष

गुहागर, ता. 9 : कामामध्ये अनेक पोट ठेकेदार, अशामध्ये हे काम माझे आहे, याचे एस्टीमेंट वाढवा अशा प्रकारचे काही नगरसेवक (Corporator) व नगरसेविकांचे पतीच धमकावत आहेत. यातून आम्ही मानसिकता काय ठेवायची, याबाबत आपण जिल्हाधिकारी यांच्यांकडेच तक्रार करणार होतो. अशी व्यथा  गुहागर नगरपंचायतीच्या सभेतच (Guhagar Nagar Panchayat) कर्मचाऱ्यांनी मांडल्यावर सर्व अवाक झाले. The husband of the corporator intervenes

नगराध्यक्ष राजेश बेंडल (Mayor Rajesh Bendal) यांच्या अध्यक्षतेखाली सभा मंगळवारी गाजली.

बांधकाम सभापती वैशाली मालप यांनी गुहागर हद्दीमध्ये सूरू होणाऱ्या कामाबाबत आपल्याला काहीच सांगितले जात नाही, असे सांगताच आपण प्रत्येक ठेकेदाराला अशाप्रकारची सूचना करत असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले. शहरात अनेक विकासकामांची भूमिपूजने झाली. परंतू कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. कामे वेळेवर सुरू न होता निधी परत गेला तर याला प्रशासनला जबाबदार धरले जाईल, असा सूर उमटला.

तेव्हा काम वेळेत सुरू अथवा कामाच्या दर्जाबाबत काही बोललो तर, हे काम माझे आहे. सव्वा लाखाचे एस्टीमेंट दोन लाखापर्यंत न्या, अशाप्रकारे धमकावण्याचा प्रकार काही नगरसेवक (Corporator)  व नगरसेविकांचे पती करत आहेत. आजर्यंत आपण सहन केल. यापुढे सहन होणार नाही. याबाबत आपण जिल्हाधिकारी यांच्यांकडेच तक्रार करणार होतो, असे एका कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर शांतता पसरली. 23 कामे अद्याप सूरू झाली नसल्याचे प्रशासनाने यादीत वाचून दाखविले.

यावर नगराध्यक्षांनी सदर विषय सावरत पुन्हा एकदा संबंधित ठेकेदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याची नोटीस पाठवण्यास प्रशासनाला सांगितले. त्याचप्रमाणे आपल्याला एकत्रित काम करून गुहागरचा विकास करायचा आहे. त्यामुळे वाद वाढवू नये. असे आवाहन सुरू केले. The husband of the corporator intervenes

नाहीतर पैसे जाणार फुकट

विरोधी पक्षनेते उमेश भोसले यांनी, ज्या जागेवर नगरपंचायतीचे जनरेटर फाऊंडेशनसाठी 7 लाख रूपये खर्च केले, ती जागा अद्याप आपल्या नावावर का केली नाही. आम्हाला मात्र 2 लाखांच्या कामांसाठी  संमत्तीपत्र आणा, असे सांगितले जाते. जी जागाच आपल्याच नावावर नाही, ती जागा संबंधित मालकाने देण्यास नकार दिला तर नगरपंचायतीने केलेले खर्च फुकट जाणार, यामुळे वेळीच जागा नावावर करून घ्यावी असे सांगितले. The husband of the corporator intervenes

दुरूस्ती सुचविण्यासाठी मुदत वाढवा. गुहागर नगरपंचायतीच्या (Guhagar Nagar Panchayat)डीपी बसवताना जागेचा नकाशा सर्वांसमोर ठेवताना जनतेला काही दुरूस्ती सुचविण्याकरीता दिलेली मुदत आणखी आठ दिवसांनी वाढवा, अशी मागणी नगराध्यक्ष राजेश बेंडल (Mayor Rajesh Bendal)यांनी प्रशासनाकडे केली. तर गुहागरचा सीआरझेडचा प्रश्न आपण सर्वांनी आपल्याच कारकिर्दीमध्ये पूर्ण करू असा विश्वास व्यक्त केला. The husband of the corporator intervenes

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMayor Rajesh BendalNews in GuhagarThe husband of the corporator intervenesटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.