नीलेश सुर्वे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड
Guhagar News Special
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भारतीय जनता पक्षाचे (BJP) गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नियुक्ती पत्रात सदरच्या नियुक्ती पत्रात – ही नियुक्ती शासनाकडून नवीन आदेश होईपर्यंत किंवा शासनाकडून सदर नियुक्ती रद्द होईपर्यंत यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत अबाधित राहील. असे नमुद करण्यात आले आहे. The honor of the struggling activist
ही नियुक्ती निश्चितच राजकीय स्वरुपाची असते. ज्यांच्या हाती सत्ता असते ते आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना अशी पदे देतात. भाजपानेही गुहागरचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी नेमणुक केली. ही नियुक्ती गुहागर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी आनंदाची आहेच त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील विविध पक्षातील, सामाजिक संघटनांमधील नीलेश सुर्वे यांचे हितचिंतक यांच्यासाठी देखील आनंददायी आहे. The honor of the struggling activist
The honor of the struggling activist
ऐन उमेदीच्या काळात निस्वार्थी आणि प्रामाणिक वृत्तीने भारतीय जनता पार्टीचे बुथ स्तरापासून काम करणार, पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला न्याय देण्यासाठी सर्वस्व अर्पून तळमळीने काम करणार, कोणताही अभिनिवेश, पदाची लालसा न बाळगता काम करणारा त्याचबरोबर निवडणुकीच्या राजकारणातही समजून उमजुन वावरणारा असा कार्यकर्ता विरळा पहायला मिळतो. निलेश सुर्वेच्या रुपाने भाजपाला हा कार्यकर्ता मिळाला. माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती प्रशांत शिरगांवकर, सध्याचे भाजप जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांला आकार दिला.
त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये बुथ प्रमुखापासुनच कामाला सुरवात केली. 2009 नंतर पक्षाच्या कठीण काळात भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून चांगले काम केले. संघटन कौशल्याबरोबरच निवडणुकांची जबाबदारी घेवून त्यात पक्षाला यश मिळवुन देण्यात ते भाजप तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वी झाले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करून पक्षाने निलेश सुर्वे यांच्या कामाची दखल घेतली आहे. या नियुक्तीमुळे आता निलेश सुर्वे यांचा कार्यकर्ता ते नेता असा प्रवास सुरू झाला आहे.
त्याच्या निवडीने भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी शुभेच्छा देताना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीसाठी याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.
या निवडीबद्दल माजी आमदार व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य विनयजी नातू , उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे, जिल्हा सरचिटणीस नागेश धाडवे , शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, कोकणचे नेते माजी मंत्री रामदास कदम, माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, भाजपचे चिपळूण तालुकाध्यक्ष ताम्हणकर, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.