गुहागर, ता. 28 : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते व मुंबई येथे नोकरी निमित्त वास्तव्यास असणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अनंत रसाळ यांची नुकतीच पोलीस उप निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली, असून त्यांचा नुकताच वरवेली तेलीवाडी येथील श्री काशीविश्र्वेश्वर मंदिरात सत्कार करण्यात आला. The Glory of Rasal in Teliwadi

वरवेली तेलीवाडीत श्री हसलाई देवीची पालखी घर भेटीला आली होती. पोलीस खात्यात सेवा करणारे अनंत यशवंत रसाळ हेही आपल्या गावी आले होते. यावेळी वरवेली तेलीवाडी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. The Glory of Rasal in Teliwadi

त्यावेळी बोलताना अनंत रसाळ म्हणाले की, माझ्याच गावी माझा सत्कार होणे हे भाग्यच आहे. परंतु,आज माझी श्रद्धास्थान असलेली ग्रामदेवता श्री हसलाई देवीच्या समोर माझा गौरव होणे हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा योग आहे. मातेच्या आशीर्वादामुळेच या पदावर मी पोहचू शकलो. गावातील सर्वाचा आशीर्वाद मिळत राहो, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला दीपक किर्वे, मुंबई मंडळाचे सचिव संजय किर्वे, दशरथ किर्वे, प्रभाकर किर्वे, रामचंद्र किर्वे, चंद्रकांत किर्वे, बळीराम पवार, दत्ताराम किर्वे, मधुकर किर्वे, शिवदास किर्वे उपस्थित होते. The Glory of Rasal in Teliwadi
