विठ्ठल भालेकर, केंद्रीय मंत्र्याच्या दौऱ्याने समस्या मार्गी लागली
Guhagar News, ता. 22 : एप्रिल आणि मे या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल (Prahlad Singh Patel) आणि परशोत्तम रुपाला (Parshottam Rupala) यांचे गुहागर (Guhagar) तालुक्यात दौरे झाले. या दौऱ्यांमुळेच गेल्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. किमानपक्षी केंद्र सरकारच्या पटलावर हा विषय आला. Inclusion of Dabhol Bay in National Waterways, वाळुचा पट्टा हटविण्याचे काम वेगाने झाल्यास दाभोळ खाडीतील अर्थकारणाला चालना मिळेल. (The economy in Dabhol Bay will be boosted) अशी प्रतिक्रिया भाजपचे (BJP) ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल तथा बावा भालेकर यांनी व्यक्त केली.
गुहागर पंचायत समितीचे माजी उपसभापती, रत्नागिरी जिल्हा डी.सी.झेड.एम.ए. समितीचे सदस्य, रत्नागिरी जिल्हा मच्छीमार संघाचे संचालक, महाराष्ट्रातील मच्छीमार कृती समितीचे रत्नागिरी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष, वेलदूरसहकारीमच्छीव्यावसायिकसंस्थेचेअध्यक्ष, दाभोळ खाडी परिसर मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष, डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष, सागरपुत्र विद्याविकास संस्था दाभोळचे उपाध्यक्ष, भाजपच्या पंचायत राज ग्रामिण विकास सेलचे जिल्हा संयोजक, कोळी महासंघाचे जिल्हा संयोजक म्हणून कार्यतर असलेले विठ्ठलभालेकरदाभोळखाडीतीलवाळुचापट्टा (गोद) हटविण्यासाठीगेली 6-7 वर्ष पाठपुरावाकरतहोते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोणोवाल (Sarbanand Sonowal) यांच्या पत्रामुळे त्यांना अत्यानंद झाला होता. दाभोळ खाडीतील वाळुच्या पट्ट्यामुळे अनेक वर्ष जीव मुठीत धरुन मच्छीमार समुद्रात जात होते. त्यांची ही समस्या आता मार्गी लागेल याचे समाधान त्यांना आहे.The economy in Dabhol Bay will be boosted
याबाबत Guhagar News जवळ बोलताना भालेकर म्हणाले की, दाभोळ खाडीच्या मुखावर म्हणजे वाशिष्ठी नदी समुद्राला मिळते तेथे धरणाच्या बांधासारखा एक मोठा वाळुचा पट्टा (गाद Sand Bar) तयार झाला आहे. त्यामुळे दाभोळ, वेलदूर, नवानगर, धोपावे येथील मच्छीमार (Fisherman) नौकांना डोंगराच्या बाजुने अरुंद, लाटा उसळणाऱ्या भागातून समुद्रात मच्छीमारीसाठी जावे लागते. समुद्रात गेलेल्या नौकांना खाडीत येताना भरती ओहोटीचा अंदाज घेवूनच आत यावे लागते. या धोकादायक वहातुकीमध्ये (dangerous transport) अनेकवेळा खाडीच्या मुखावर अपघात (accident) झाले आहेत. अनेकवेळा उसळणाऱ्या लाटांमुळे नौका खडकावर आपटून त्यांना जलसमाधी मिळाली आहे. The economy in Dabhol Bay will be boosted
पाच वर्षांपूर्वी दाभोळ खाडीतील वाळु बार्जद्वारे मुंबई, गुजरात पर्यंत नेण्याचा व्यवसाय सुरु होता. यातील काही बार्ज वाळुच्या पट्ट्यात अडकली. त्यामुळे हा व्यवसाय बंद झाला. त्याचप्रमाणे दाभोळ खाडीत जहाज बांधणीचे दोन प्रकल्प (Ship Building Projects) सुरु झाले होते. मात्र मोठी जहाजे खाडीत येऊ न शकल्याने हे प्रकल्प बंद पडले. त्यातून स्थानिकांना मिळणारा रोजगार (Employment) बुडाला. The economy in Dabhol Bay will be boosted
The economy in Dabhol Bay will be boosted
सदर वाळुचा पट्टा हलविल्यास मच्छीमारांचा धोकादायक प्रवास संपेल. पूर्वीप्रमाणे दाभोळ, वेलदूर बंदरात मच्छीमार नौकांची यातायात वाढेल. वादळी परिस्थितीत अनेक नौकांना दाभोळ खाडीत सुरक्षितपणे नौका उभ्या करता येतील. प्रवासी जल वहातुक निर्धोकपणे होईल. त्यामुळे मुंबई दाभोळ, गोवा दाभोळ जलवहातुकीला चालना मिळेल. एकूणच दाभोळ खाडीतील अर्थकारणाला चालना मिळेल. हे मुद्दे गेली 6-7 वर्ष केंद्र सरकारला केलेल्या पत्रव्यवहारातून सांगितले होते. दोन मंत्र्यांच्या प्रवासामुळे या विषयाला गती मिळाली.