सुरळमधील घटना, शांतता राखण्यात पोलीस यशस्वी
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील सुरळमधील समाधी स्थळाच्या संरक्षक कठड्या लावलेली दानपेटी कठडा तोडून दानपेटीच्या सुरक्षेसाठी लावलेल्या व्यवस्थेसह अज्ञातांनी चोरली. 17 एप्रिलला रात्री विश्र्वस्तांनी पोलीसांकडे तक्रार दाखल केली. शांततेचा भंग होवू नये म्हणून समाधी स्थळाला संरक्षण दिले. 18 एप्रिलच्या तपासात रिकामी दानपेटी सापडली. अज्ञातांचा उद्देश चोरीचाच होता हे लक्षात आल्यावर वातावरणातील तणाव निवळला. The donation box near the mausoleum was stolen
सुरळ गावात पाली फाट्याजवळ जंगली पीरबाबाचे समाधी स्थळ आहे. या समाधी स्थळाच्या सभोवताली मार्बल लावलेला संरक्षक कठडा आहे. या समाधी स्थळावर सर्वधर्मिय लोक दर्शनासाठी येतात. हे भाविकांना ऐच्छिक देणगी अर्पण करता यावी म्हणून संरक्षक कठड्याला एक दानपेटी बसविण्यात आली आहे. ही पेटी सहज उचलून नेता येवू नये म्हणून पेटीलाही लोखंडी सांगड्याचे संरक्षण देण्यात आले होते. The donation box near the mausoleum was stolen
बुधवार दि. 12 एप्रिल पासून ते सोमवार दि. 17 एप्रिल दरम्यान अज्ञात व्यक्तींनी समाधी स्थळाच्या सभोवताली असलेला संरक्षक कठडा तोडला. दानपेटी लोखंडी सांगड्यासह पळवली. 17 एप्रिलला ही बाब लक्षात आली. कठड्याची तोडफोड झाल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. मात्र गुहागर पोलीसांनी घटनास्थळी जावून शांतता प्रस्थापित केली. समाधी स्थळाला संरक्षण दिले. कठड्याच्या तोडफोडीबरोबरच दानपेटी बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलीसांनी तातडीने श्र्वान पथक आणि बोटांचे ठसे शोधणाऱ्या पथकाला तातडीने पाचारण केले. 17 एप्रिलला रात्री उशिरा चोरीचा व धार्मिक स्थळाच्या तोडफोडीचा गुन्हा अज्ञात व्यक्तींवर दाखल करण्यात आला. The donation box near the mausoleum was stolen
मंगळवारी (ता. 18 एप्रिल) सकाळी पुन्हा एकदा पोलीसांनी तपास सुरु केला. त्यावेळी श्र्वानपथकाने दाखविलेल्या दिशेला अधिक तपास केला असता, समाधी स्थळापासून सुमारे 100 मिटरवर एका वहाळात लोखंडी सांगड्यासह दानपेटी सापडली. ही दानपेटी फोडून त्यातील ऐवज अज्ञातांनी चोरला होता. लोखंडी सांगडा व दानपेटी सापडल्याने अज्ञात इसमांचा हेतू केवळ चोरीचाच होता हे स्पष्ट झाले. त्यामुळे वातावरणातील तणाव निवळला. पोलीसांनी अज्ञातांविरुध्द भारतीय दंडसंविधान अधिनियम 295, 295 अ, 454, 457, 380 प्रमाणे, दानपेटी पळवणे, चोरी करणे, धार्मिक स्थळाची मोडतोड करणे असे गुन्हे नोंदविले आहेत. अधिक तपास गुहागरचे प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते करीत आहेत. The donation box near the mausoleum was stolen
