• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चौथीतील चौकस मुलांनी शोधली सायकल

by Guhagar News
March 24, 2022
in Guhagar
19 0
0
चौथीतील चौकस मुलांनी शोधली सायकल

The curious children find out the bicycle

36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चाणाक्षपणा कौतुकास्पद, मोबाईलद्वारे केली खात्री

एका मंदिराजवळ उभी असलेली सायकल पाहून दोन मुले सावध होतात. ही सायकल आपल्या मित्राची तर नव्हेना असा विचार मनात त्यांच्या मनात येतो. लगेच पालकांजवळचा मोबाईल घेवून तिसऱ्या मित्राला फोन लावतात. हा मित्र सायकलची ओळख पटावी म्हणून त्या दोन मित्रांना सायकल फोटो व्हॉटसॲप करण्यास सांगतो. मोबाईलवरचा फोटो आपल्या सायकल हरवलेल्या मित्राला दाखवतो. आणि सकाळी हरवलेली सायकलचा अवघ्या 6 तासात शोध लागतो. म्हटलं तर घटना साधीच. पण चौथीमधील 11 वर्षांच्या मुलांमधील चौकस, चाणाक्षपणा आणि तंत्रस्नेही वृत्तीमुळे हरवलेल्या सायकल शोध लागतो. हा पराक्रम निश्चित कौतुकास्पद आहे. The curious children find out the bicycle

हे सगळ नाट्य गुहागर आणि आरेगाव मध्ये घटले. गुरुवारी (ता. 24) सकाळी वरचापाट येथील अर्णव समीर घाणेकर याची सायकल अंगणातून अज्ञान व्यक्ती घेवून जाते. गंमत म्हणजे अर्णवची सायकल नेताना ही व्यक्ती दुसरी सायकल तेथे ठेवते. अर्णवचे आईबाबा आजुबाजुला चौकशी करतात. हा सगळा प्रकार नेमका कसा घडला हे कोणाच्याही लक्षात येत नाही. हिरमुसला अर्णव शाळेत जातो. तिथे वर्गातील मित्रांना हा किस्सा सांगतो. अर्णवची सायकला हरविल्याची गोष्ट आता श्रीमती अन्नपुर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक शाळेतील सर्वांपर्यंत पोचलेली असते. दुपारी 1 च्या दरम्यान शाळा सुटते आणि मुले आपापल्या घरी जायला निघतात.

अर्णव घाणेकरच्या अंगणात ठेवलेली सायकल

The curious children find out the bicycle

आरेगावातील कुमारी ग्रंथा नागेश बोले आणि कैवल्य सुनील भोसले ही दोघे आरेगावात श्रीराम मंदिराजवळ रहातात. घरी जात असताना सहज त्यांच लक्ष श्रीराम मंदिराकडे जातं. तिथे त्यांना एक लाल रंगाची सायकल दिसते. ग्रंथा आणि कैवल्य यांच्यातील चौकसपणा जागृत होतो. त्यांना आठवतं आपला वर्गमित्र अर्णवची सायकल आजच चोरीला गेली आहे. मग ही सायकल अर्णवचीच असेल का. आपल्या पालकांना ग्रंथा आणि कैवल्य ही गोष्ट सांगतात. मग पालक चौकशी करतात तेव्हा श्रीराम मंदिरातील एक जण सांगतो की ही सायकल सकाळपासुन इथे आहे. अजुन कोणी न्यायला आलेला नाही. ग्रंथा आणि कैवल्यच्या पालकांकडे अणर्वच्या घरचा फोन नसतो पण वरचापाट मध्ये रहाणाऱ्या वरदच्या आईचा मोबाईल क्रमांक असतो. मग ही दोन मुले वरदला फोन लावून सांगतात की श्रीराम मंदिराजवळ एक सायकल सकाळपासून उभी आहे. The curious children find out the bicycle

आता वरद फोनवरुन ग्रंथा आणि कैवल्यला अर्णवच्या सायकला रंग आणि इतर वर्णन सांगतो. ते वर्णन त्या सायकलशी मिळते जुळते असते. तरीही खात्रीसाठी चाणाक्ष वरद या दोघांना त्या सायकलाचा फोटो व्हॉटसॲप करायला सांगतो. आईच्या व्हॉटसॲपवर आलेला फोटो वरद धावत जावून अर्णवला दाखवतो. ही सायकल अर्णवचीच असल्याचे निश्चित होते. मग अर्णवचे पालक जावून ही सायकल घेवून येतात. आणि सहा तासांनी हरवलेल्या सायकलचा शोध संपतो. The curious children find out the bicycle

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe curious children find out the bicycleटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.