जाधव कुटुंबावर आघात, गाव शोकाकुल
Guhagar News : आज (दि. 19 जानेवारी) मुंबई गोवा महामार्गावर रेपोली तालुका माणगाव येथे झालेल्या भिषण अपघातामुळे हेदवीतील जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज रात्री हेदवीत 7 मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दोन मृतांवर मुंबईत व एक मृत महिलेवर कळंबस्ती, ता. सावंतवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अपघातामुळे हेदवी गावावर शोककळा पसरली आहे. आज हेदवी उमराठ गावातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.The cremation of seven people in Hedvi
आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावर मौजे रेपोली तालुका माणगाव येथे मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (MH.43.U.7119) चिपळुणकडे येणाऱ्या इको कारला (MH.48.BT.8673) धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, इको कारचा चक्काचूर झाला. या कारमधील चालक, 2 मुले व 7 प्रवासी असे एकूण 10 मृत्युमुखी पडले. अपघातानंतरचे सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर सायं. 4 च्या दरम्यान माणगाव उपजिल्हा रुग्णालयातून नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यात आले. The cremation of seven people in Hedvi
मृत पावलेल्या मधील 7 जणांवर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यामध्ये
1. अमोल रामचंद्र जाधव (वय 40 रा हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी)
2. दिनेश रघुनाथ जाधव (वय 30 राहणार हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार मालाड मुंबई)
3. निशांत शशिकांत जाधव (वय 23 राहणार विरार पूर्व कोकण निवास नारंगी रोड)
4. निलेश चंद्रकांत पंडित (वय 45 राहणार हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी सध्या रहाणार काळाचौकी, मुंबई)
5. नंदिनी निलेश पंडित वय 40 (निलेशची पत्नी)
6. मुद्रा निलेश पंडित वय 12 (मुलगी)
7. भव्य निलेश पंडित वय 4 (मुलगा)
यांचा समावेश आहे. The cremation of seven people in Hedvi
8. स्नेहा संतोष सावंत वय 45 राहणार सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग सध्या राहणार जोगेश्वरी मुंबई यांचा मृतदेह त्यांच्या मुळगावी कळबंस्ती येथे नेण्यात येणार आहे.
9. कांचन शशिकांत शिर्के वय 58 राहणार चिपळूण जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार नवी मुंबई
10 .दीपक यशवंत लाड वय 60 राहणार कॉटन ग्रीन मुंबई
यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी मुंबईत नेले.
हेदवीवर शोककळा
हेदवीत वर्षश्राद्धासाठी येणारी ही सर्वजण एकमेकांची जवळची नातेवाईक आहेत. अमोल जाधव, दिनेश जाधव एकाच घरातील. तसेच कांचन शिर्के ही दिनेश जाधव यांची बहिण. या दुर्दैवी अपघातात हेदवीतील एक संपूर्ण कुटुंब (निलेश पंडीत) मृत पावले. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.The cremation of seven people in Hedvi
