बाल भारती पब्लिक स्कूलचे विद्यार्थी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे विक्रमधारक
गुहागर, ता. 24 : अंजनवेल येथील बाल भारती पब्लिक स्कूल (BBPS) येथे इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी लिओना पॅट्रिशिया कुरागंटी आणि इयत्ता पहिलीत शिकणारा तिचा भाऊ रिचर्ड व्हिन्सेंट कुरागंटी यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम प्रस्थापित करत नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, या दोघांनी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही रेकॉर्ड टायटल व ग्रँड मास्टर टायटल प्राप्त केले आहे. The brother and sister made history
रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाच्या निवासी संकुलात रहाणारे रामबाबू कुरागंटी गेल इंडियाच्या कोकण एलएनजी प्रकल्पात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मोठी मुलगी लिओना पॅट्रिशिया कुरागंटी आणि लहान मुलगा रिचर्ड व्हिन्सेंट कुरागंटी हे प्रकल्पांतर्गत असलेल्या बाल भारती पब्लिक स्कुलमध्ये शिकतात. ७ वर्षे, १० महिने व १ दिवस वयाच्या लिओना पॅट्रिशिया कुरागंटी हिने जगातील सर्व देशांच्या राजधानी सर्वात जलद पाठ करण्याचा विक्रम केला, तिने हा पराक्रम अवघ्या १ मिनिट ३८ सेकंद आणि ४५ मिलिसेकंदांत साध्य केला. वैयक्तिक स्पर्धेत तिने नोंदवलेली वेळ पूर्वीचा विक्रम तोडणारी ठरली आहे. त्यामुळे लिओना पॅट्रिशिया इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सची मानकरी ठरली. The brother and sister made history
तसेच ६ वर्षे, २ महिने आणि १८ दिवस वयाच्या रिचर्ड व्हिन्सेंट कुरागंटी याने १ ते ५० पर्यंतच्या संख्यांचे वर्ग सर्वात जलद पाठ करण्याचा विक्रम नोंदवला. त्याने हे आव्हान अवघ्या ४३.६० सेकंदांत पूर्ण केले. यापूर्वी हा विक्रम ५६ सेकंद आणि १७ मिलीसेकंद असा होता. रिचर्डने हा विक्रम मोडीत काढत इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नव्या जागतिक विक्रमासह नोंदवले आहे. The brother and sister made history
या भाऊ बहिणींनी ही असामान्य कामगिरी याने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी केली. विशेष म्हणजे त्यांच्या या कामगिरीची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली. त्यामुळे लिओना पॅट्रिशिया कुरागंटी हीने रेकॉर्ड टायटल आणि रिचर्ड व्हिन्सेंट ग्रँड मास्टर टायटल प्राप्त केले आहे. Record Title म्हणजे एखाद्या व्यक्तीने विशिष्ट क्षेत्रात केलेल्या असामान्य, मोजता येणाऱ्या आणि अधिकृतरीत्या प्रमाणित केलेल्या कामगिरीसाठी दिलेले पद असते. तर Grand Master Title हे केवळ एका विक्रमापुरते मर्यादित नसून, लहान वयात मोठ्या स्तरावर बुद्धिमत्ता, वेग, अचूकता आणि प्रावीण्य मिळविण्याचा विक्रम करणाऱ्या मुलांना दिले जाते. या दोन्ही मुलांकडून ही कामगिरी करण्यासाठीचा सराव त्यांची आई सौ. अनुपमा कुरागंटी यांनी करुन घेतला. The brother and sister made history
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या या असामान्य कामगिरीबद्दल बाल भारती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व कर्मचारी यांची दोन्ही मुलांचा सत्कार केला. तसेच कोकण एलएनजी लिमिटेडच्या व्यवस्थापनानेही या मुलांचे विशेष कौतुक केले आहे. या मुलांनी केलेला पराक्रम कोकण विभागातील अनेक हुशार, होतकरू मुलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. असे मत मुख्याध्यापिका यांनी दोघांच्या सत्काराचे वेळी व्यक्त केले. The brother and sister made history
